लोकपाल विधेयकाच्या मसुद्याला अंतिम आकार

By admin | Published: November 30, 2015 01:04 AM2015-11-30T01:04:54+5:302015-11-30T01:04:54+5:30

लोकपाल विधेयकावर जवळपास वर्षभर काथ्याकूट केल्यानंतर संसदीय समितीने मसुदा अहवालाला अंतिम आकार दिला असून राज्यसभेत या आठवड्यात म्हणजे १० डिसेंबरपूर्वी तो सादर होण्याची शक्यता आहे.

Final shape of Lokpal bill draft | लोकपाल विधेयकाच्या मसुद्याला अंतिम आकार

लोकपाल विधेयकाच्या मसुद्याला अंतिम आकार

Next

नवी दिल्ली : लोकपाल विधेयकावर जवळपास वर्षभर काथ्याकूट केल्यानंतर संसदीय समितीने मसुदा अहवालाला अंतिम आकार दिला असून राज्यसभेत या आठवड्यात म्हणजे १० डिसेंबरपूर्वी तो सादर होण्याची शक्यता आहे.
कार्मिक, जनतक्रारी निवारण, कायदा आणि न्याय या विभागांचा समावेश असलेल्या काँग्रेसचे खासदार ई.एम. सुदर्शन नचिप्पन यांच्या नेतृत्वातील ३१ संसदीय स्थायी समितीने लोकपाल आणि लोकायुक्त आणि अन्य संबंधित कायद्यासंबंधी (सुधारणा) विधेयक २०१४ चा अभ्यास चालविला होता. मसुदा अहवाल तयार असून समितीच्या सर्व सदस्यांना तो वितरित केला जाईल. सर्व सदस्यांची मते विचारात घेतल्यानंतर तो १० डिसेंबरपूर्वी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांना सादर केला जाईल, अशी माहिती नचिप्पन यांनी दिली. या समितीने सदर विधेयकाच्या विविध तरतुदींवर व्यापक सल्लामसलत केली असून मुलकी नोकरदारांसह विविध घटकांच्या मतांचा विचार केला आहे.

Web Title: Final shape of Lokpal bill draft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.