जेरवासियो पेरेरा खूनी हल्ला प्रकरण अंतिम टप्प्यात
By Admin | Published: September 8, 2015 02:08 AM2015-09-08T02:08:40+5:302015-09-08T02:08:40+5:30
मडगाव : उत्ताेर्डा - माजोर्डा येथील व्यावसायिक जेरवासियो पेरेरा याच्यावरील खूनी हल्ला प्रकरण अंतिम टप्प्यात पोहचले आहे. पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांची साक्ष दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष पी.व्ही.सावईकर यांनी नोंदवून घेतली. शासनातर्फे सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी बाजू मांडली.
म गाव : उत्ताेर्डा - माजोर्डा येथील व्यावसायिक जेरवासियो पेरेरा याच्यावरील खूनी हल्ला प्रकरण अंतिम टप्प्यात पोहचले आहे. पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांची साक्ष दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष पी.व्ही.सावईकर यांनी नोंदवून घेतली. शासनातर्फे सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी बाजू मांडली.उत्ताेर्डा येथील जेरवासियो पेरेरा हा मडगावात जाउन मोटरसायकलने आपल्या घरी परत येत असताना, वाटेत त्याची मोटरसायकल उत्ताेर्डा येथील डायगो पेरेरा , वेलसांव येथील लॉरेन्स मास्कारेन्स व ब्रुनो उर्फ ब्राज फर्नांडीस यांनी अडविली. जेरवासियो याच्यावर या तिघांनीही हॉकी स्टिक, लोखंडी सळी व चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले.संशयितांनी त्याच्या पत्नीलाही मारहाण करताना, दुचाकीचीही मोडतोड केली. पुर्ववैमन्स्यातून हा हल्ला झाला होता.आपण या प्रकरणी फिर्याद नोंदवून घेतली. रक्ताळलेले कपडे, तक्रारदारावर हल्ला करण्यासाठी वापरलेली शस्त्रे, साक्षिदारांचे जवाब नोंदवून संशयितांवर गुन्हाही नोंद केला असे निरीक्षक नार्वेकर यांनी सरतपासणीत सांगितले. (प्रतिनिधी)