...अखेर दाऊद इब्राहिमचा पत्ता सापडला
By Admin | Published: May 11, 2016 10:26 PM2016-05-11T22:26:04+5:302016-05-11T22:29:23+5:30
कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडल्याचा दावा सीएनएन न्यूज 18 या वृत्तवाहिनीनं केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडल्याचा दावा सीएनएन न्यूज 18 या वृत्तवाहिनीनं केला आहे. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमधल्या कराचीतल्या क्लिफ्टॉनमध्ये एका बंगल्यात गुप्तरीत्या राहत असल्याची माहिती या वृत्तवाहिनीनं दिली आहे.
सीएनएन न्यूज 18च्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा बंगला हा अबोटाबादमध्ये असलेल्या ओसामा बिन लादेनच्या बंगल्यासारखाच आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातील कराचीतील सद्दार शहरातील क्लिफ्टॉन हे श्रीमंत नगरातच दाऊद सध्या वास्तव्याला आहे. सीएनएन न्यूज 18नं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हे उघड झालं आहे. मात्र पाकिस्ताननं त्यांचा दावा फेटाळला आहे.
माजी एनएसए अधिकारी लीला पोनप्पा यांनी पाकिस्ताननं अजूनही दाऊदला लपवतं आहे , याचं आश्चर्य वाटलं नसल्याचं म्हटलं आहे. तर दाऊद हा पाकिस्तानातला सर्वात मोठा इंटेलिजन्स अॅसेट आहे. तसेच तो पाकिस्तानाचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांच्याही खूप जवळचा असल्याची माहिती एस बालकृष्णन यांनी दिली आहे. दाऊद इब्राहिमला गँगरिन झाल्याचं वृत्तही काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. दाऊद इब्राहिम हा छोटा शकिलच्या जवळ असल्याचंही वृत्तही त्यावेळी फेटाळण्यात आलं होतं.
दाऊद इब्राहिमच्या बंगल्याविषयी माहिती-
पाकिस्तानमधल्या कराचीतल्या क्लिफ्टॉनमधल्या ब्लॉक 4, डी 13 मध्ये दाऊद वास्तव्याला
दाऊद इब्राहिमचा बंगल्याभोवती दोन्ही बाजूला मोकळा परिसर
दाऊदच्या क्लिफ्टॉनमधल्या बंगल्याची भिंत 3 मीटर एवढी उंच