अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 08:36 PM2020-07-21T20:36:07+5:302020-07-21T20:47:07+5:30
OnePlus Nord हा 4 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून Blue Marble आणि Gray Onyx या दोन रंगांमध्ये मिळणार आहे. अॅमेझॉनवर याची विक्री केली जाणार आहे.
OnePlus ने आज अखेर बहुचर्चित सामान्यांना परवडणारा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus Nord 5G नुकताच लाँच झाला असून भारतातील किंमतीही जाहीर करण्यात आल्या आहेत.
OnePlus Nord 5G तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 6GB, 64GB च्या व्हेरिअंटची किंमत Rs. 24,999 आहे. तर 8GB, 128GB व्हेरिअंटची किंमत Rs. 27,999 आहे. तर तिसरा व्हेरिअंट 12GB, 256GB ची किंमत Rs. 29,999 ठेवण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ कार्ल पेई य़ांनी महिन्याभरापूर्वीच किंमत 25000 रुपयांच्या आत असणार असल्याचे संकेत दिले होते.
OnePlus Nord हा 4 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून Blue Marble आणि Gray Onyx या दोन रंगांमध्ये मिळणार आहे. अॅमेझॉनवर याची विक्री केली जाणार आहे.
कॅमेरा
वनप्लस नॉर्डमध्ये सेल्फीसाठी 32+8MP Selfie Camera आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स 616 सेन्सर देण्यात आला आहे. पाठीमागे 48-megapixel चा कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर कॅमेराचा सेटअप 48+8+5+2MP Quad Rear camera असा आहे. 4115mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Snapdragon 765G
Nord also comes with the highest resolution front camera setup on any OnePlus phone. In addition to a main 32-megapixel sensor, you’ll also find another ultra wide angle lens with a 105° field of view so you can fit more in your frame. pic.twitter.com/0PUc6DIv1S
— OnePlus (@oneplus) July 21, 2020
यामध्ये Snapdragon 765G हा ५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच डिस्प्ले हा 6.44 इंचाचा 90hz फुल अमोल्ड फ्ल्युईड आहे. तसेच इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा स्वस्त फाईव्ह जी फोन असणार आहे. रिलायन्सने भारतात ५जी सेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी मुंबई, दिल्लीमध्ये स्पेक्ट्रमची मागणीही करण्यात आली आहे. सध्या 5जी चे भारतात उपलब्ध असलेले फोन हे 45000 च्या वरचे आहेत.
स्वस्त इअरबड्सही लाँच
वनप्लसने स्वस्त इअर बड्सही लाँच केले आहेत. 4,990 रुपयांना हे बड्स विकले जाणार आहेत. यामध्ये नॉईस कॅन्सलेशन, सिलिकॉन इअर टिप्स, वायरलेस चार्जिंगसारखे फिचर मिळणार नाहीत. 80 मिनिटांत फुल चार्ज होणार असून 7 तासांचा ऑडियो प्लेबॅक टाईम, तसेच केसमध्ये अतिरिक्त बॅटरी आदी असल्याने एकूण 30 तासांचा पॉवर बॅकअप मिळणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'
चांदी चकाकली! सोन्याच्या किंमतीतही बदल; जाणून घ्या दर
Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार
करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...
4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप
कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार