या भीतीने चीनचे सैन्य लडाखमधून माघारी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:34 PM2018-08-16T13:34:55+5:302018-08-16T13:37:56+5:30
लडाख मधील डेमचोक भागात 400 मिटर आतमध्ये चीनच्या सैनिकांनी पाच तंबू उभारले होते.
नवी दिल्ली : भारतीय हद्दीत महिन्याभरापासून ठाण मांडून बसलेले चीनचे सैनिक अखेर आज त्यांच्या हद्दीत परतले आहेत. लडाख मधील डेमचोक भागात 400 मिटर आतमध्ये चीनच्या सैनिकांनी पाच तंबू उभारले होते. काल यापैकी तीन तंबू त्यांनी काढले होते.
चीनचे संरक्षणमंत्री पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासमोर भारत चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता होती. डेमचोक सेक्टरवरून दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये नेहमी वाद होत असतात. या भागावर दोन्ही देशांनी आपला दावा सांगितला आहे. याचबरोबर गेल्या वर्षी डोकलामध्येही चीनी सैनिकांनी दोन महिन्यांपर्यंत घुसखोरी केली होती.
भारत-चीनदरम्यान 4047 किमी लांबीची नियंत्रण रेषा आहे. एवढ्या मोठ्या लांबीच्या सीमेवर चीनने ठिकठिकाणी घुसखोरी केलेली आहे. ब्रिगेडियर स्तरावरच्या बैठकीनंतर चीनने नुकतेच डेमचोक भागातील तीन तंबू हटविले होते. मात्र, 2 तंबूंमध्ये सैनिक राहत होते. आज हे सैनिक दोन्ही टेंट काढून चीनच्या हद्दीत परतले आहेत.