अखेर बिअर कॅनवरून हटणार गांधीजींचे चित्र

By admin | Published: January 24, 2015 02:32 PM2015-01-24T14:32:47+5:302015-01-24T14:33:01+5:30

अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने बिअरच्या कॅनवर महात्मा गांधींचे छायाचित्र छापल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर आता या कंपनीने गांधीजींचे चित्र व नाव न छापण्याचा निर्णय घेतला आहे.

Finally, Gandhiji's portrait will be removed from beer cannabis | अखेर बिअर कॅनवरून हटणार गांधीजींचे चित्र

अखेर बिअर कॅनवरून हटणार गांधीजींचे चित्र

Next
>ऑनलाइन लोकमत
कनेक्टिकट (अमेरिका), दि. २४ - अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने बिअरच्या कॅनवर महात्मा गांधींचे छायाचित्र छापल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर आता या कंपनीने गांधीजींचे चित्र व नाव न छापण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका स्थित न्यू इंग्लंड ब्रूईंग कंपनी या कंपनीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नावे अमेरिकेतील बाजारपेठेमध्ये 'गांधी बोट' ही बिअर आणली होती.  गांधींजींप्रमाणे ही बिअरही शाकाहारी असून आत्म शुद्धिकरण आणि सत्याच्या शोधात असलेल्यांसाठी ही बिअर उपयुक्त आहे अशी जाहिरातबाजीही या कंपनीने सुरु केली होती. मात्र या प्रकाराचे भारतात तीव्र पडसाद उमटले. . हैद्राबादमधील एका वकिलाने न्यायालयामध्ये कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. महात्मा गांधीजींचे छायाचित्रांचा अशा कामासाठी वापर करणे दंडनीय अपराध असून यामुळे राष्ट्रभावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्ते वकिल जनार्दन रेड्डी यांनी केला होता. त्यानंतर या कंपनीला जाग आली असून त्यांनी आता गांधीजींचे नाव व चित्र काढून टाकण्याचा व त्या बिअरला दुसरे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 
ब-याच विचारानंतर आम्ही 'गांधी-बॉट'चे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही आणि या माध्यामातून भारतीय-अमेरिकी समुदायाला असलेला आमचा पाठिंबाही आम्हाला दर्शवता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. याप्रकरणी कंपनीने यापूर्वीच माफी मागितली होती. 
 

Web Title: Finally, Gandhiji's portrait will be removed from beer cannabis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.