...अखेर सचिन जाधव पोलिसांना शरण राजस हॉस्पिटलमधील दुहेरी हत्या प्रकरण : हत्याकांडाचे कारण गुलदस्त्यातच
By admin | Published: May 11, 2016 10:14 PM2016-05-11T22:14:35+5:302016-05-11T22:14:35+5:30
जळगाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव हा ६ दिवसानंतर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांना शरण आला. अटकेनंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यात सचिनने संपूर्ण घटनाक्रम उलगडला. मात्र, हे हत्याकांड का केले? याबाबत त्याने मौन पाळल्याने हत्याकांडाचे रहस्य गुलदस्त्यातच राहिले आहे.
Next
ज गाव : रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये ५ मे रोजी मध्यरात्रीनंतर घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव हा ६ दिवसानंतर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांना शरण आला. अटकेनंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यात सचिनने संपूर्ण घटनाक्रम उलगडला. मात्र, हे हत्याकांड का केले? याबाबत त्याने मौन पाळल्याने हत्याकांडाचे रहस्य गुलदस्त्यातच राहिले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका हॉटेलजवळ येऊन थांबला होता. या प्रकाराची माहिती होताच, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील कर्मचार्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. दुपारी १२.३० वाजेनंतर त्याला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या अटकेची कार्यवाही झाली. पत्नी व लेकीची हत्या का केली? याबाबत पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सचिनची चौकशी केली. परंतु त्याने याविषयी कोणतीही माहिती दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.आज न्यायालयात हजर करणारसचिन जाधव याला जिल्हापेठ पोलीस गुरुवारी दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.