अखेर मोदींच्या मंत्रिमंडळाची लॉटरी फुटली; अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 01:02 PM2019-05-31T13:02:01+5:302019-05-31T14:42:33+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले असून रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ वाटप (कॅबिनेट )
अमित शहा - गृहमंत्री
निर्मला सीतारमन - अर्थमंत्री
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
नरेंद्र सिंग तोमर - कृषीमंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज
पीयुष गोयल - रेल्वे मंत्री
स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्री
नितीन गडकरी - दळणवळण
प्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि माहिती प्रसारण
रवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी
रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण
सदानंद गौडा - रसायन आणि खते
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग
तावरचंद गेहलोत - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
डॉ. एस जयशंकर - परराष्ट्र मंत्री
रमेश पोखरियाल - मनुष्यबळ विकास
अर्जुन मुंडा - आदिवासी विभाग
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब संवर्धन, विज्ञान आणि तंत्रज्ञान
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टील
मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक
प्रल्हाद जोशी - लोकसभा, कोळसा आणि खाण
डॉ. महेंद्र नाथ पांडे - कौशल्य विकास
गिरीराज सिंह- पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय
गजेंद्र शेखावत- जल शक्ती
राज्यमंत्री - स्वतंत्र कार्यभार
>> संतोष कुमार गंगवार -कामगार आणि रोजगार
>> इंद्रजीत सिंह -सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
>> श्रीपाद नाईक -आयुर्वेद योगा; संरक्षण राज्यमंत्री
>> डॉ. जितेंद्र सिंह - इशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, अणू उर्जा
>> किरण रिजिजू - युवा आणि खेळ
>> प्रल्हाद सिंह पटेल - सांस्कृतीक, पर्यटन
>> राजकुमार सिंह- उर्जा, नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा
>> हरदीपसिंग पुरी - गृहनिर्माण, नागरी विमानोड्डाण
>> मनसुख मांडवीय- जलवाहतूक, रसायन आणि खते राज्यमंत्री
राज्यमंत्री
>> फग्गनसिंह कुलस्ते - स्टील
>> अश्विनीकुमार चौबे आरोग्य आणि कुटुंब कल्यान
>> अर्जुन मेघवाल - लोकसभा कामकाज, अवजड उद्योग, समाज कल्यान
>> व्ही. के. सिंह - रस्ते वाहतूक
>> कृष्णपाल गुज्जर - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
>> रावसाहेब दानवे - ग्राहक, अन्न व नागरी वितरण
>> जी. किशन रेड्डी - गृह मंत्रालय
>> पुरुषोत्तम रुपाला -कृषी आणि शेतकरी कल्यान
>> रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
>> साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास
>> बाबुल सुप्रियो - पर्यावरण, वने
>> डॉ. संजीवकुमार बालियान - पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय
>> संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास
>> अनुराग ठाकूर - अर्थ आणि कॉर्पोरेट अफेयर्स
>> सुरेश अंगडी - रेल्वे
>> नित्यानंद राय -गृह
>> रतनलाल कटारिया - जल शक्ती, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
>> व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र, लोकसभा कामकाज
>> रेणुकासिंह - आदिवासी
>> सोमप्रकाश -वाणिज्य आणि उद्योग
>> रामेश्वर तेली - अन्न प्रक्रिया उद्योग
>> प्रतापचंद्र सरंगी - लघू मध्यम उद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय
>> कैलाश चौधरी -कृषी आणि शेतकरी कल्याण
>> देवश्री चौधरी -महिला आणि बाल विकास
General (Retd) VK Singh to be the MoS in the Ministry of Road Transport & Highways, Ramdas Athwale to be the MoS in the Ministry of Social Justice & Empowerment, Anurag Thakur to be the MoS in the Ministry of Finance and Ministry of Corporate Affairs. pic.twitter.com/dyxxIu19Rc
— ANI (@ANI) May 31, 2019