...अखेर मुंबई पोलिसांना मिळणार उच्च दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट

By admin | Published: May 10, 2017 04:27 PM2017-05-10T16:27:42+5:302017-05-10T16:50:01+5:30

चौकशीअंती ही जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचंही सिद्ध झालं होतं

Finally, the Mumbai Police will get a high quality bulletproof jacket | ...अखेर मुंबई पोलिसांना मिळणार उच्च दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट

...अखेर मुंबई पोलिसांना मिळणार उच्च दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात भारताच्या तीन पोलिसांनी वीरमरण पत्करलं. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून 26/11ला हल्ला करणा-या दहशतवाद्यांचा सामना केला होता. मात्र दहशतवाद्यांच्या एके 47 पुढे करकरेंच्या जॅकेटचा निभाव लागला नाही आणि ते शहीद झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि इन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर हे दोघेही निकृष्ट दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमुळेच शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर चौकशीअंती ही जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचंही सिद्ध झालं होतं. 

मात्र आता लवकरच मुंबई पोलिसांना दर्जेदार लष्करी बुलेटप्रूफ जॅकेट मिळणार आहेत. महाराष्ट्र पोलीस विभागानं 5000 एमकेयू जॅकेट्स खरेदी करण्यासाठी कानपूरमधल्या लष्करी उपकरणे उत्पादकांना ऑर्डर दिली असून, लवकरच ते जर्मनीवरून ही उच्च दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट आयात करणार आहेत. गेल्या वेळी 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली महाराष्ट्र पोलिसांनी बुलेटप्रूफ जॅकेट विकत घेतली होती. मात्र ती विकत घेतलेली जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचं 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातून सिद्ध झालं होतं. तसेच या जॅकेटला 9 एमएमच्या पिस्तूलमधून सुटलेली गोळीही भेदू शकते हे एका चाचणीतून समोर आलं होतं. महाराष्ट्र पोलिसांची संख्या 2 लाख असतानाही त्यांनी फक्त 2000 बुलेटप्रूफ जॅकेट विकत घेतली होती. त्यांचा पुरवठा मार्च 2011मध्ये करण्यात आला होता.

आता 32,474 कोटी रुपयांमध्ये महाराष्ट्र सरकार ही नवी बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करणार असून, ती पोलीस विभागातल्या वेगवेगळ्या युनिटमध्ये वितरीत करण्यात येणार आहेत. नवी बुलेटप्रूफ जॅकेट मुंबई पोलीस, शीघ्र कृती दल, फोर्स वन, राज्य राखीव पोलीस दल, विशेष कृती दल, गडचिरोली पोलीस आणि नक्षली भागांमधल्या पोलिसांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली आहे.

विकत घेण्यात येणा-या बुलेटप्रूफ जॅकेटच्या नमुन्याची चंदीगढमधल्या केंद्रीय फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी ती बुलेटप्रूफ जॅकेट एके 47, सेल्फ लोडेड रायफल्स सारख्या बंदुकांच्या गोळ्या भेदू शकत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीही जूनमध्ये ती जॅकेट आल्यावर त्याची आम्ही पुन्हा एकदा केंद्रीय फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी घेणार असल्याचंही व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं आहे. 

Web Title: Finally, the Mumbai Police will get a high quality bulletproof jacket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.