अखेर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, शाहनवाज हुसेन यांच्यासह या १७ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

By बाळकृष्ण परब | Published: February 9, 2021 02:01 PM2021-02-09T14:01:51+5:302021-02-10T09:25:02+5:30

Bihar Government Cabinet Expansion : सरकार स्थापन करताना झालेल्या शपथविधीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अगदी मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता तब्बल ८४ दिवसांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच  विस्तार झाला

Finally, Nitish Kumar's cabinet was expanded, 17 people including Shahnawaz Hussain were sworn in as ministers | अखेर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, शाहनवाज हुसेन यांच्यासह या १७ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अखेर नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, शाहनवाज हुसेन यांच्यासह या १७ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Next
ठळक मुद्देनितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकूण १७ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीयामध्ये भाजपाच्या कोट्यातून ९ आणि जेडीयूच्या कोट्यातून आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीभाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते शाहनवाज हुसेन यांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ हे या मंत्रिपद विस्ताराचे वैशिष्ट्य ठरले

पाटणा - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या बहुमतासह बिहारमधील सत्ता कायम राखण्यात जेडीयू आणि भाजपाला यश मिळाले होते. मात्र सरकार स्थापन करताना झालेल्या शपथविधीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अगदी मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता तब्बल ८४ दिवसांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच  विस्तार झाला असून, भाजपाचे दिग्गज नेते शाहनवाज हुसेन यांच्यासह भाजपा, जेडीयू आणि अन्य अशा मिळून एकूण १७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यामध्ये एकूण १७ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाच्या कोट्यातून ९ आणि जेडीयूच्या कोट्यातून आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते शाहनवाज हुसेन यांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ हे या मंत्रिपद विस्ताराचे वैशिष्ट्य ठरले.

नितीश कुमार सरकारच्य मंत्रिमंडळ विस्तारात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) शाहनवाज हुसेन - भाजपा
२) श्रवण कुमार - जेडीयू
३) मदन सहनी - जेडीयू
४) प्रमोद कुमार - भाजपा
५) संजय झा - जेडीयू
६) लेसी सिंह - जेडीयू
७) सम्राट चौधरी - भाजपा
८) नीरज सिंह - भाजपा
९) सुभाष सिंह - भाजपा
१०) नितीन नवीन - भाजपा
११) सुमित कुमार सिंह (अपक्ष)
१२) सुनील कुमार -(जेडीयू)
१३) नारायण प्रसाद - भाजपा
१४) जयंत राज - जेडीयू
१५) आलोक रंजन झा - भाजपा
१६) जमा खान - जेडीयू
१७) जनक राम - भाजपा

Web Title: Finally, Nitish Kumar's cabinet was expanded, 17 people including Shahnawaz Hussain were sworn in as ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.