सपा आणि काँग्रेसमध्ये अखेर आघाडी
By admin | Published: January 22, 2017 11:05 AM2017-01-22T11:05:45+5:302017-01-22T11:27:09+5:30
जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेली काँग्रेस आणि सपामध्ये अखेर निवडणूकपूर्व आघाडीवर शिक्कामोर्तब
Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 22 - जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेली काँग्रेस आणि सपामध्ये अखेर निवडणूकपूर्व आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली असून, नव्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 105 जागा देण्यावर सहमती झाली आहे. आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 104 ते 106 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सपा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजपा आणि बसपासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने 100 हून अधिक जागांची मागणी केल्यानंतर सपा आणि काँग्रेसमधील आघाडीच्या चर्चेला अर्धविराम लागला होता. सपाने अवघ्या 84 जागा देण्याची तयारी दर्शवल्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच आघाडीची शक्यताही मावळली होती. मात्र प्रियांका गांधी आणि अहमद पटेल यांनी सपासोबत आघाडी होण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा आजच होण्याची शक्यता आहे.
Samajwadi party-Congress alliance sealed for the upcoming Uttar Pradesh Assembly polls
— ANI UP (@ANINewsUP) 22 January 2017
SP-Congress alliance sealed: Congress sources say it will get 104-106 seats in the upcoming Uttar Pradesh Assembly polls
— ANI UP (@ANINewsUP) 22 January 2017