बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 11:21 AM2020-08-19T11:21:23+5:302020-08-19T11:49:47+5:30

बस हायजॅक केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Finance company employees hijack bus full of passengers in Uttar Pradesh's Agra | बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ

बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक केल्याची माहिती मिळत आहे. बस हायजॅक केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामहून मध्य प्रदेशकडे जाणारी एक खासगी बस हायजॅक करण्यात आली आहे. चालक आणि कंडक्टरला बसमधून उतरवून बस अज्ञात स्थळी नेण्यात आली आहे.

बसमध्ये तब्बल 34 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी (19 ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली आहे. मलपुरा परिसरात ही खासगी बस  हायजॅक करण्यात आली. त्यानंतर वाहनचालक व कंडक्टरला बसमधून खाली उतरवण्यात आलं. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. बसविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून काही लोक बसमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी बसचालक आणि कंडक्टर यांना बसमधून उतरवून त्यांनी बस अज्ञात स्थळी घेऊन गेल्याची माहिती आहे.

खासगी बसचा चालक आणि पोलीस श्रीराम फायनान्स कंपनीचे नाव घेत आहेत. या फायनान्स कंपनीचे लोक जायलो एसयूव्ही गाडीतून आले आणि त्यांनी बस ताब्यात घेतली अशी माहिती आहे. बस हायजॅक करणाऱ्यांनी चालक व कंडक्टरला ढाब्यावर जेवण दिले सोबत 300 रुपयेही दिले. मात्र बस सध्या कुठे आहे, याबाबत कोणालाच माहिती नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : हादरवणारी आकडेवारी! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 27 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा दिसताहेत लक्षणं, वेळीच व्हा सावध

"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! खेड्यापाड्यात पायी प्रवास करून 'हे' डॉक्टर्स करताहेत रुग्णांवर उपचार 

Web Title: Finance company employees hijack bus full of passengers in Uttar Pradesh's Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.