पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी अथसंकल्पात निधी : दीपक सावंत

By admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:54+5:302015-12-14T23:52:54+5:30

निफाड : तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे, ट्रामाकेअर सेंटर उभारणे याबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांनी नागपूर येथे राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेतली. यावेळी येत्या अर्थसंकल्पात पिंपळगाव बसवंत येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Finance Fund for Pimpalgaon Sub-District Hospital: Deepak Sawant | पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी अथसंकल्पात निधी : दीपक सावंत

पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी अथसंकल्पात निधी : दीपक सावंत

Next
फाड : तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे, ट्रामाकेअर सेंटर उभारणे याबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांनी नागपूर येथे राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेतली. यावेळी येत्या अर्थसंकल्पात पिंपळगाव बसवंत येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अनिल कदम यांनी सोमवारी (दि. १४) आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाबाबत चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार जयकुमार रावल, दीपिका चव्हाण, आरोग्य सचिव सुजाता सैनिक, आरोग्यसेवा संचालक सतीश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे उपस्थित होते. (वार्ताहर)
फोटो- १४ निफाड १
कॅप्शन : नागपूर येथे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत पिंपळगाव बसवंत जिल्हा रुग्णालयासंदर्भात झालेल्या बैठकीत राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार जयकुमार रावल, दीपिका चव्हाण, आरोग्य सचिव सुजाता सैनिक, आरोग्यसेवा संचालक सतीश पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे उपस्थित होते.

Web Title: Finance Fund for Pimpalgaon Sub-District Hospital: Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.