ई- फायलिंग पोर्टलबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 10:10 AM2021-06-23T10:10:47+5:302021-06-23T10:15:01+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलबाबत असलेल्या तांत्रिक समस्या कायम असून, या लवकरात लवकर कशा साेडविता येतील, याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या चर्चेच्या वेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, महसूल सचिव तरुण बजाज, सीबीडीटीचे चेअरमन जगन्नाथ मोहापात्रा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सीतारामन यांनी सर्व समस्यांचा तपशीलवार आढावा घेऊन त्या लवकरात लवकर साेडविण्यास सांगितले. या बैठकीबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान, भारतीय सनदी लेखापाल संघटनेने (आयसीएआय) पत्रक काढले असून त्यामध्ये ई-फायलिंग पोर्टलबाबतच्या तांत्रिक समस्या लवकरात लवकर साेडविल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या बैठकीला या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.