Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:08 PM2020-02-01T12:08:07+5:302020-02-01T12:16:16+5:30
सीतारामन यांनी वाचली भारताचं महात्म अधोरेखित करणारी कविता
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करत आहेत. यावेळी त्यांनी देशाचं वर्णन करताना काश्मीरचा खास उल्लेख केला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एका कवितेचा आधार घेतला. काश्मिरी कवी पंडित दिनानाथ यांची कविता वाचून दाखवत सीतारामन यांनी देशाचं महात्म्य अधोरेखित केलं. त्यांनी या कवितेचा हिंदी आणि इंग्रजीतला अनुवाददेखील वाचून दाखवला.
निर्मला सीतारामन यांनी वाचून दाखवलेल्या कवी पंडित दिनानाथ यांच्या कवितेतल्या ओळी-
हमारा वतन खिलते हुए सालीमार बाग जैसे,
हमारा वतन डल में खिलते हुए कमल जैसा,
नवजवनों के गर्म खून जैसा,
मेरा वतन तेरा वतन, हमारा वतन,
दुनिया का सबसे प्यारा वतन
पंडित दीनानाथ कौल द्वारा रचित कविता के माध्यम से बजट सत्र को संबोधित करते हुए केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण: हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग जैसे, हमारा वतन डल झील में खिलते हुए कमल जैसा,नवजवानों के गर्म खून जैसा,
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2020
मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन
दुनिया का सबसे प्यारा वतन।। pic.twitter.com/BTCG54w7Jt
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावर मोदी सरकारनं काश्मीरकडे लक्ष केंद्रीत केलं. जवळपास सात दशकांपासून काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यानंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कित्येक महिने काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. यानंतर आता हळूहळू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात काश्मीरचा विशेष उल्लेख केला.