फोर्ब्सच्या १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यंदाच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 04:51 AM2020-12-10T04:51:29+5:302020-12-10T07:42:22+5:30

Nirmala Sitharaman News : ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने २०२० वर्षासाठी तयार केलेल्या जगभरातील १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश केला आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman in this year's list of 100 most powerful women of Forbes | फोर्ब्सच्या १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यंदाच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन

फोर्ब्सच्या १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यंदाच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन

googlenewsNext

नवी दिल्ली : ‘फोर्ब्स’ या नियतकालिकाने २०२० वर्षासाठी तयार केलेल्या जगभरातील १०० सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा, बायोकॉन कंपनीच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांचा समावेश आहे.

या तिघींचा गेल्या वर्षीच्या यादीतही समावेश होता. यंदाच्या यादीत निर्मला सीतारामन या ४१ व्या क्रमांकावर असून, रोशनी नाडर मल्होत्रा यांनी ५५ वे व किरण मजुमदार-शॉ यांनी ६८ वे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल या सर्वोच्च स्थानी आहेत. मर्केल यांनी यादीत प्रथम क्रमांक २००६ सालापासून कायम राखला आहे. त्याला  अपवाद २०१० सालाचा होता. त्यावर्षी बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना हे स्थान देण्यात आले होते. या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्डे या दुसऱ्या क्रमांकावर व अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री
निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ  महिला अर्थमंत्री आहेत. याआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:कडे अर्थखाते ठेवले होते. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा ही जुलै २०२० पासून त्या कंपनीची सीईओ बनली आहे. बायोकॉनची स्थापना किरण मजुमदार- शॉ यांनी केली.

Web Title: Finance Minister Nirmala Sitharaman in this year's list of 100 most powerful women of Forbes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.