सर्पदंश झालेल्या रुग्णांना आर्थिक मदत करावी : राऊत
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:15+5:302015-08-18T21:37:15+5:30
ओतूर : मंदिरासाठी लाखो रुपयांच्या देणगी देणार्या दानशूरांनी सर्पदंश झालेल्या आर्थिक, दुर्बल घटकातील व आदिवासी रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी तातडीचे आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मिनू मेहता हॉस्पिटलचे सर्पमित्र डॉ. सदानंद राऊत यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथे केले.
Next
ओ ूर : मंदिरासाठी लाखो रुपयांच्या देणगी देणार्या दानशूरांनी सर्पदंश झालेल्या आर्थिक, दुर्बल घटकातील व आदिवासी रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी तातडीचे आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मिनू मेहता हॉस्पिटलचे सर्पमित्र डॉ. सदानंद राऊत यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथे केले. लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर यांच्या वतीने येथील ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्पदंश प्रथमोपचार, सर्पाच्या विविध जाती, त्यांच्या दंश करण्याची पद्धती, सर्पाची स्थाने या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे होते. यानिमित्ताने मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, मुख्याध्यापक शिवाजी अस्वार, उपमुख्याध्यापक प्रभाकर शिंदे, दिनकर दरोडे, मुख्याध्यापक रामचंद्र तितर, पंकज घोलप, शरद साळवे, लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ चव्हाण, माजी अध्यक्ष जयसिंग परदेशी, लायन्स प्रा. विलास भालेकर, डॉ. भरत घोलप, लायन्सचे खजिनदार यश मस्करे, रवींद्र हांडे, रवींद्र लोहोटे, संजय उर्किडे, विद्यालयाचे शिक्षक व ३०० विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने डॉ. घोलप व यश मस्करे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सदानंद राऊत हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्पविष उपचारतज्ज्ञ असून, परदेशात त्यांनी सर्व विष उपचाराबद्दल व्याख्याने दिली आहेत. आतापर्यंत सर्पदंश झालेल्या दोन हजार रुग्णांना उपचार करून जीवनदान दिले आहे.सर्पदंश झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार होणे गरजेचे असते, लसी उपलब्ध होत नाही. त्या महाग असतात म्हणून लायन्स क्लब शिवनेरी या लसी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याप्रमाणेच जे धनिक आहेत ते मंदिरासाठी देणग्या देतात. धनिकांनी, दानशूर व्यक्तींनी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार करणार्यांना आर्थिक मदत द्यावी. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचतील, असे आवाहन राऊत यांनी केले. शरद माळवे यांनी प्रास्ताविक केले. पंकज घोलप यांनी आभार मानले.