आर्थिक सुधारणा उपायांवरून सरकारला घेरणार

By admin | Published: November 25, 2014 01:21 AM2014-11-25T01:21:34+5:302014-11-25T01:21:34+5:30

आर्थिक सुधारणात्मक उपाययोजनांना प्रखरपणो विरोध करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत विरोधी पक्षांनी दिले आहेत.

Financial reform measures will cover the government | आर्थिक सुधारणा उपायांवरून सरकारला घेरणार

आर्थिक सुधारणा उपायांवरून सरकारला घेरणार

Next
संसदेचे अधिवेशन : विरोधक आक्रमक, कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्य मिळण्याची मोदींना आशा
नवी दिल्ली : आर्थिक सुधारणात्मक उपाययोजनांना प्रखरपणो विरोध करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत विरोधी पक्षांनी दिले आहेत. दुसरीकडे संसदेचे हिवाळी अधिवेशन शांततेत चालविण्यासाठी विरोधी पक्ष सहकार्य करतील, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. 
आर्थिक सुधारणा, विमा विधेयक आणि काळ्या पैशाच्या मुद्यावरून विरोधी पक्षांची सरकारविरुद्ध एकजूट होण्याची चिन्हे आहेत, तर सरकारनेही अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी डावपेच आखले आहेत. 
‘या देशातील जनतेने आम्हाला सरकार चालविण्याची जबाबदारी दिलेली आहे. परंतु यासोबतच त्यांनी या संसदेत बसलेल्या सर्वाना हा देश चालविण्याचीही जबाबदारी दिलेली आहे,’ असे मोदी म्हणाले. ते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी बजावलेल्या सकारात्मक भूमिकेची प्रशंसा करताना मोदी पुढे म्हणाले, सर्व खासदारांकडून असेच सहकार्य यापुढेही मिळेल, अशी आशा आहे. शांत चित्ताने आणि शांत वातावरणात जनकल्याणाची अनेक कामे केली जातील, असा आपला विश्वास आहे. सरकार चालविण्याची जबाबदारी असलेले आणि देश चालविण्याची जबाबदारी असलेले सर्व जण मिळून देशाच्या प्रगतीसाठी काम करतील. हे अधिवेशन उपयुक्त ठरेल, याबद्दल मी आशावादी         आहे. (वृत्तसंस्था)
 
4विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 
4डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, राजद, समाजवादी पार्टी आणि बसपा या पक्षांनी विमा विधेयकाविरुद्ध एकजूट केली आहे आणि विरोधी पक्षांच्या या ‘ऐक्या’ला काँग्रेसनेही पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.
 
4मागच्या अधिवेशनात विरोधकांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच चांगले काम करता आले. असाच अनुभव यावेळीही येईल, अशी आपल्याला आशा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अनेक विरोधी पक्षांनी संसदेत विमा विधेयकाला विरोध करण्याचा आणि काळ्या पैशाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोदी यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरते.
 
दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज तहकूब
नवी दिल्ली : राज्यसभेचे विद्यमान सदस्य मुरली देवरा यांचे आज झालेले निधन आणि याआधी निधन झालेल्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात   आल़े
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता़ लोकसभेचे विद्यमान सदस्य हेमेंद्र चंद्र सिंह, कपिल कृष्ण ठाकूर, अमिताव नंदी, एम़एस़संजीवी राव, अवैद्यनाथ, सैफुद्दीन चौधरी, संजयसिंह चौहान, बrादत्त आणि आज पहाटे निधन झालेले राज्यसभेचे विद्यमान खासदार मुरली देवरा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ त्यानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल़े राज्यसभेत सभापती हामीद अन्सारी यांनी भाजपाचे मेघराज जैन यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ दिली़ राज्यसभेतही दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कामकाज स्थगित करण्यात   आल़े
 
प्रीतम मुंडे यांना शपथ
लोकसभेत सभागृहाचे कामकाज सुरू होताच, लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जागी निवडून आलेल्या त्यांच्या कन्या प्रीतम गोपीनाथ मुंडे, रंजना बेन भट्ट आणि तेजप्रताप सिंह यादव या नवनियुक्त सदस्यांना शपथ दिली़
 
 
 यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली़   (वृत्तसंस्था)
 
काळा पैसा; प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्याची मागणी
जयशंकर गुप्त ल्ल नवी दिल्ली
काळ्या पैशाच्या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रय}ात असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाने या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राज्यसभेत मंगळवारी प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्याची नोटीस दिली आहे.
श्रम सुधारणांसह अनेक महत्त्वाची विधेयके मंगळवारी राज्यसभेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. ही विधेयके पारित करण्यात विरोधक बाधा निर्माण करू शकतात. संयुक्त जनता दलाचे सदस्य के. सी. त्यागी आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य डेरेक ओ ब्रायन यांनी सोमवारी राज्यसभा सभापती हामिद अंसारी यांना प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्याची मागणी करणारी नोटीस दिली. अन्य पक्षांकडूनही अशाप्रकारची नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे.
काळ्या पैशाच्या मुद्यावरून मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होण्याच्या तयारीत आहेत आणि मंगळवारी राज्यसभेत गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे सरकारनेही राज्यसभेत कामकाज सुरळीत चालविण्यासाठी डावपेच आखले आहेत. संजदचे खासदार के. सी. त्यागी म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत काळा पैसा हा मुख्य मुद्दा होता. 
या मुद्यावरच भाजपाने विजय मिळविला. परंतु सत्तेवर येताच भाजपाला या मुद्याचा विसर पडला. आम्हाला या मुद्यावर व्यापक चर्चा हवी आहे. मंगळवारी प्रश्नोत्तराचा तास निलंबित करून या मुद्यावर चर्चा करण्यासाठी संजदतर्फे आपण एक नोटीस दिलेली आहे.’
 
 
 
 

 

Web Title: Financial reform measures will cover the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.