मुरगूडमधील कोळेकर कुटुंबास गडहिंग्लज शिंपी समाजातर्फे आर्थिक मदत
By admin | Published: March 23, 2017 05:16 PM2017-03-23T17:16:00+5:302017-03-23T17:16:00+5:30
Next
>मुरगूड : गेल्या महाशिवरात्रीला (२४ फेब्रुवारी) शॉर्टसर्किटने लागलेल्या प्रचंड आगीमध्ये मुरगूड (ता. कागल) येथील बाजारपेठेतील युवा कापड दुकानचालक धनंजय कोळेकर व त्यांची पत्नी प्रियांका हे दाम्पत्य मृत्युमुखी पडले. तसेच या आगीमध्ये त्यांचे राहते घर व कापड दुकानही जळून सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे कोळेकर दाम्पत्याची दोन अल्पवयीन मुले रोहित (वय १६) व ज्ञानेश्वर (९) त्याचे वृद्ध आजी-आजोबा यांच्यासह हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून गडहिंग्लज नामदेव शिंपी समाजातर्फे रोहित व ज्ञानेश्वर यांच्या भावी शिक्षणासाठी म्हणून हजारो रुपयांची मदत गडहिंग्लज शिंपी समाजाध्यक्ष भारत विठ्ठल कोळेकर, उपाध्यक्ष संजय पिसे व खजिनदार तुकाराम खटावकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सचिव गजानन काकडे, सदस्य सर्वश्री सुनील खटावकर, दिलीप खटावकर, रवींद्र महाडिक, विष्णू खटावकर, मोहन हवाळ, चंद्रकांत कोपर्डे, गजानन खटावकर, राजेंद्र औंधकर, तय्यब अली पटेल हजर होते.मुरगूड शिंपी समाज संघटनेचे सचिव जयवंत हावळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुरगूडचे नगरसेवक विशाल सूर्यवंशी, राहुल वंडकर, किशोर पोतदार, गडहिंग्लज कृषी बाजार समितीचे संचालक दत्तामामा खराडे, चंद्रकांत माळवदे, पांडुरंग कोळेकर सदानंद मिरजकर, विकी साळोखे, मकरंद धर्माधिकारी, महादेव वंडकर, विनायक हावळ, निवृत्ती वंडकर, आदी मान्यवर उपस्थित होते. फोटो ओळ : मुरगूड (ता. कागल) येथील जळीतग्रस्त कोळेकर कुटुंबाला गडहिंग्लज नामदेव शिंपी समाजातर्फे आर्थिक मदत देताना समाजाध्यक्ष भारत विठ्ठल कोळेकर, उपाध्यक्ष संजय पिसे व खजिनदार तुकाराम खटावकर, चंद्रकांत माळवदे, आदी उपस्थित होते.फोटो इडिट 22 कोळेकर