खडकाळी सिग्नलला कचर्‍याचा विळखा

By Admin | Published: October 6, 2016 10:23 PM2016-10-06T22:23:29+5:302016-10-07T00:09:46+5:30

नाशिक : शालिमार ते गंजमाळ दरम्यान असणार्‍या खडकाळी सिग्नलला कचर्‍याने वेढले असून, या ठिकाणी मुक्या जनावरांचाही सतत वावर असल्याने अस्वच्छतेत वाढ होत असून, तातडीने हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.

Find out the trash for the ring signal | खडकाळी सिग्नलला कचर्‍याचा विळखा

खडकाळी सिग्नलला कचर्‍याचा विळखा

googlenewsNext

नाशिक : शालिमार ते गंजमाळ दरम्यान असणार्‍या खडकाळी सिग्नलला कचर्‍याने वेढले असून, या ठिकाणी मुक्या जनावरांचाही सतत वावर असल्याने अस्वच्छतेत वाढ होत असून, तातडीने हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.
अनेक भाजीबाजारांना अतिक्रमणांचा विळखा
नाशिक : शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची एकाच वेळी गर्दी होत असून, नागरिकांनी आणलेल्या वाहनांमुळे भाजीबाजार परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तातडीने वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
नियोजित थांब्यावर बस थांबत नसल्याची तक्रार
नाशिक : जुने सिडको परिसरातील स्टेट बँक चौक या बसथांब्यावर अंबडच्या दिशेने जाणार्‍या बसेस महामार्गावरून न जाता लेखानगर मार्गे जाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच नियोजित थांब्यावर या थांबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
गॅस वितरकांकडून ग्राहकांची फसवणूक
नाशिक : शहरातील गॅस एजन्सीज ग्राहकांकडून नियमापेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे. एजन्सी देत असलेल्या पावतीवरील रकमेपेक्षा २० ते ३० रुपये जादा आकारले जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे.
आदर्शनगर भागात ठेल्यांचे अतिक्रमण
नाशिक : पवननगर भागातील आदर्शनगर परिसरात भेळ विक्रेत्यांचे ठेले आणि व्यावसायिकांच्या संख्येत वाढ होत असून, सायंकाळी या भागातून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
पाथर्डी फाटा येथे अवैध भाजीबाजार स्थापन
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पाथर्डी फाटा परिसरात भाजी विक्रे त्यांनी बेकायदेशीररीत्या व्यवसाय सुरू केल्याने या परिसरात वाहतूक कोंडीसह अस्वच्छतेची समस्यादेखील उद्भवत आहे.
मॉडेल कॉलनी परिसरात पथदीप बंद
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कॉलेजरोड भागातील मॉडेल कॉलनी परिसरातील पथदीप बंद असल्याने परिसरात टवाळखोरांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधी विकासकामे राबविण्यात असमर्थ ठरल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
गंजमाळ परिसरात भंगार बाजाराचे वाढते साम्राज्य
नाशिक : खडकाळी सिग्नल ते द्वारकाकडे जाणार्‍या मार्गावर भंगार बाजाराचे अतिक्रमण वाढले असून, भंगार व्यावसायिकांची दुकाने रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
लेखानगर परिसरात ट्रक थांब्यामुळे अडसर
नाशिक : सिडको लेखानगर परिसरात मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपुलाखाली अवजड वाहतूक करणारी वाहने तसेच ट्रक उभ्या राहत असल्याने वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध होत नाही. वाहतूक प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
आश्विननगर परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद
नाशिक : आश्विननगर येथील राजे संभाजी स्टेडिअम परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत सिगारेट, मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे बघायला मिळते. येथून अंबड पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांचा धाक उरला नसल्याचे जाणवते.

Web Title: Find out the trash for the ring signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.