कारगिल युद्धात गमावली हाताची बोटं; उद्योगपती जावयाने सांगितली दुकानदार सासऱ्याची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 10:07 AM2023-05-09T10:07:56+5:302023-05-09T10:09:32+5:30
Zerodha कंपनीचे संस्थापक नितिन कामथ यांनी सासऱ्यांच्या दुकानासमोर उभे राहून त्यांच्यासमवेतचा फोटो पोस्ट केला आहे.
देशातील नामवंत उद्योगपती आणि अब्जाधिश नितीन कामथ यांनी आपल्या लिंक्ड इन अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, आपल्या सासऱ्यांच्या धाडसाची गोष्टच त्यांनी सांगितलीय. नितीन कामथ यांचे सासरे शिवाजी पाटील हे भारतीय सैन्य दलात होते. विशेष म्हणजे त्यांनी कारगिल युद्धातही कर्तव्य बजावले होते. त्यावेळी, युद्धात शत्रुशी लढताना त्यांच्या हातीच बोटे कापली गेली होती. त्यानंतर, ते हवालदार पदावरुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त झाले होते. सध्या ते ७० वर्षांचे असून एक किराणा दुकाना चालवतात.
Zerodha कंपनीचे संस्थापक नितिन कामथ यांनी सासऱ्यांच्या दुकानासमोर उभे राहून त्यांच्यासमवेतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटो नितीन हेही अतिशय साध्या अंदाजात दिसून येतात. नितीन यांच्या शेजारीच दुकानात उभे असलेले त्यांचे सासरे शिवाजी पाटील असून फोटोतही त्यांच्या हाताला बोटे नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या फोटोसह नितीन यांनी कॅप्शन दिलं आहे. ''संतुष्टि ही सच्ची स्वतंत्रता का एकमात्र तरीका है. एक व्यक्ति जो इसे मूर्त रूप देता है, वह मेरे ससुर शिवाजी पाटिल हैं.'' दरम्यान, या पोस्टमध्ये नितीन यांनी आपल्या लग्नातील एक किस्साही सांगितला आहे. ज्यावेळी, मी २००७ साली शिवाजी पाटील यांच्याकडे त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी, माझ्या सासऱ्यांनीमला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचवले होते, तेव्हा मी संघर्ष करत होतो.
नितीन कामथ हे सध्या १.१ अब्ज डॉलर्सचे मालक आहेत. मी उत्तम आरोग्यासह शेवटपर्यंत एक चांगलं आयुष्य जगण्याच्या पर्यायाचा विचार करत होतो. याचे उत्तर संतुष्ट राहणे हेच आहे, या कुठलीही शंका माझ्या मनात नाही. मानसिक आणि शारिरीक रुपात सक्रीय होणे कधीही बंद करता कामा नये. पैसे त्यास कधीही खरेदी करू शकत नाहीत. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे सासरे शिवाजी पाटील हे आहेत, असेही कामथ यांनी म्हटलंय.
दरम्यान, शिवाजी पाटील सध्या किराणा दुकान चालवतात. मुलीच्या म्हणजे सीमा पाटीलच्या यशानंतरही त्यांनी दुकान चालवणे बंद केले नाही. विशेष म्हणजे ते कधीही कुठलीही तक्रार करताना किंवा काही पाहिजे असल्याचा हव्यास करताना पाहिले नाही. ते आपल्या बेळगाव येथील दुकानात मस्त आनंदी जीवन जगत आहेत, असे नितीन कामथ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.