'खेल खत्म, फुटेज हजम'; योगेंद्र यादवांची केजरीवालांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 09:20 AM2018-06-20T09:20:50+5:302018-06-20T09:40:48+5:30
अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्याच्या मंत्रिमंडळातील सहका-यांनी केलेले धरणे आंदोलन मंगळवारी मागे घेतले. अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरु होते. या आंदोलनावर विरोधी पक्षांनी अरविंद केजरील यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचे जुने सहकारी योगेंद्र यादव यांनी सुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
योगेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, खेळ संपला, फुटेज खाल्ल. गेल्या दहा दिवसांत या नाटकामुळे दिल्लीतील जनतेला काय मिळाले? मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना अपील केले की, अधिका-यांची आणि मंत्र्यांची बैठक ठरली आहे. नायब राज्यपालांनी ही बैठक बोलविली आहे का? संप मोडला? रेशन डिलिव्हरीच्या मागणीचे काय झाले? या ठिकाणी पब्लिसिटी जास्त झाली. अजून काय पाहिजे.
खेल ख़तम, फुटेज हजम!
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) June 19, 2018
दस दिन के इस ड्रामे से दिल्ली की जनता को क्या मिला? मुख्यमंत्री ने अफसरों से अपील की, अफसरों और मंत्रियों की मीटिंग तय हो गई। क्या LG ने मीटिंग बुलाई? "हड़ताल" तुड़वाई? अफसरों को सजा हुई? राशन डिलीवरी की मांग कहां गई? हां, पब्लिसिटी खूब हुई।
और क्या चाहिए?
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या नऊ दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी सुरू असलेले आपले आंदोलन अखेर मंगळवारी मागे घेतले. आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, अशा आशयाचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर केजरीवालांनी हा निर्णय घेतला.
अरविंद केजरीवाला यांच्या धरणे आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण तापले होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वारंवार मागणी करूनही राज्यपाल अनिल बैजल प्रतिसाद देत नसल्यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांनी हे आंदोलन पुकारले होते. या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय हे दोन मंत्री 11 जूनपासून राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणे धरून बसले होते.
या आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यांनी पाठिंबा दिल्यामुळे केजरीवालांची बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे अनिल बैजल यांच्यावरील दबाव वाढला होता. अखेर त्यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाची दखल घेत चर्चेची तयारी दाखविली. त्यानंतर केजरीवालांनी मंगळवारी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.