हिंदू नेत्यांना संपवा, दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा - डी कंपनी

By admin | Published: May 8, 2016 09:02 AM2016-05-08T09:02:08+5:302016-05-08T09:10:21+5:30

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत सहभागी असलेल्या हिंदू नेत्यांना तसेच जे मुस्लिम विरोधी आहेत अशा हिंदू नेत्यांना संपवा.

Finish Hindu leaders, get jobs in South Africa - D Company | हिंदू नेत्यांना संपवा, दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा - डी कंपनी

हिंदू नेत्यांना संपवा, दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा - डी कंपनी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत सहभागी असलेल्या हिंदू नेत्यांना तसेच जे मुस्लिम विरोधी आहेत अशा हिंदू नेत्यांना संपवा आणि त्या मोबदल्यात चांगला पैसा आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा अशी आमिषे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून दाखवली जात आहेत. 
 
भारतात जातीय तणाव निर्माण करण्याची दाऊद टोळीने योजना आखली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आपल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दाऊद टोळीला युवकांची गरज असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी अशी आमिषे दाखवली जात आहेत. मागच्यावर्षी गुजरातमधील भाजप नेते शिरीष बंगाली आणि भाजप युवा नेता प्रग्नेश मिस्त्री यांची हत्या करण्यात आली होती. 
 
या प्रकरणी एनआयएने अहमदाबाद न्यायालयात दाऊद टोळीच्या दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. डी गँगने टोळीत समावेश केलेल्या नव्या सदस्यांना दारुच्या रिकाम्या बाटल्यांमधून पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या तसेच चर्चमध्ये जाळपोळ करण्याचे आदेश दिले होते. 
 
जातीय तणाव निर्माण करणे हाच त्यामागे उद्देश होता असे एनआयएने सांगितले. डी गँगने जावेद चिकनाच्या माध्यमातून भाजप, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. 
 
जावेद चिकनाने यासाठी हवालामार्गे दुबईतून गुजरातमध्य पैसा पाठवला होता. त्याने आपले संबंध वापरुन मुंबई आणि सूरतमधून बंदुकीचीही व्यवस्था केली होती. मिस्त्री आणि बंगालीची हत्या केल्यानंतर आरोपीला पाच लाख रुपये देण्यात आले असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. 
 

Web Title: Finish Hindu leaders, get jobs in South Africa - D Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.