गाझियाबादमध्ये ५ हजार जणांवर गुन्हे दाखल, ३२ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:22 AM2018-04-05T01:22:04+5:302018-04-05T01:22:04+5:30
दलित अत्याचारविरोधी कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.
गाझियाबाद - दलित अत्याचारविरोधी कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बोथट झाल्याचा आरोप करीत आयोजिलेल्या भारत बंदच्या दिवशी गाझियाबादमध्ये दंगल घडविणाऱ्या, सार्वजनिक तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पाच हजार अज्ञात लाकांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून, ३२ दंगलखोरांना अटक झाली आहे.
आतापर्यंत २८५ जणांवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. शहरी भागातील ४३ तसेच ग्रामीण भागातील १७ ठिकाणे अतिसंवेदशील असून तिथे पुन्हा हिंसक निदर्शने होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारतबंदच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांत जखमी झालेल्या नऊ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
गांधीजींच्या पुतळ््याची विटंबना
राजस्थानमधील नाथद्वारा येथे महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ््याची विटंबना करण्यात आल्याचे बुधवारी सकाळी लक्षात आले. या अर्धपुतळ््याचे शिर अज्ञात दंगेखोरांनी तोडले आहे. य्याआधी ८ मार्चला केरळमधील तलीपरम्बा येथे गांधीजींच्या पुतळ््याची विटंबना करण्यात आली होती. देशामध्ये गेल्या काही महिन्यापासून महापुरुषांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडत आहेत. तामिळनाडूमध्ये द्रविडी नेते पेरियर, पश्चिम बंगालमध्ये जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, मावना येथे डॉ. आंबेडकर, त्रिपुरामध्ये व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ््यांच्या विटंबनेचे प्रकार घडले आहेत.
संचारबंदी कायम
- मध्य प्रदेशमध्ये भारत बंदच्या दिवशी झालेल्या हिंसक निदर्शने झालेल्या ग्वाल्हेर, भिंड, मुरेना जिल्ह्यातील काही भागांमध्ये लागू केलेली संचारबंदी यापुढेही कायम राहाणार आहे.
- रोज सकाळी १० ते दुपारी १२च्या दरम्यान संचारबंदी शिथिल करण्यात येईल.
- मुरेना येथे मंगळवारी पोलिसांवर दगडफेक करणा-या ५० निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक मृतदेह मिळाल्याने राज्यात बंदच्या दिवशी ठार झालेल्यांची संख्या सात झाली आहे.