पाकव्याप्त काश्मीरवरच्या विधानावरून फारूख अब्दुल्ला व ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 09:41 PM2017-11-17T21:41:53+5:302017-11-17T21:41:57+5:30

श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री राहिलेले फारूख अब्दुल्ला व अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेले वक्तव्य त्यांना चांगलाच भोवणार आहे.

FIR against Farooq Abdullah and Rishi Kapoor on Kashmiri statement | पाकव्याप्त काश्मीरवरच्या विधानावरून फारूख अब्दुल्ला व ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल

पाकव्याप्त काश्मीरवरच्या विधानावरून फारूख अब्दुल्ला व ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल

Next

श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री राहिलेले फारूख अब्दुल्ला व अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेले वक्तव्य त्यांना चांगलाच भोवणार आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनं जम्मू-काश्मीरमधल्या जिल्हा दंडाधिका-यांकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश खजुरियांनी ही तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे फारुख अब्दुल्ला आणि ऋषी कपूर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पाकव्याप्त काश्मीर (ढडङ) हा पाकिस्तानचा भाग असून, त्याला पाकिस्तानपासून कोणीही वेगळं करू शकत नाही, असं फारूख अब्दुल्ला म्हणाले होते.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते सुरेश खजुरियांनी जम्मू-काश्मीरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. कलम 196 अंतर्गत या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर यांचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले असून, त्यावर देशद्रोही असल्याचे लिहिले आहे.

वाराणसीतील मानवाधिकार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टर लावली असल्याचे समजते. दरम्यान, काल फारुख अब्दुल्ला आणि अभिनेते ऋषी कपूर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप करत मानवाधिकार जनशक्ती पार्टीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरप्रश्नावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला होता. 

Web Title: FIR against Farooq Abdullah and Rishi Kapoor on Kashmiri statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.