क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांना त्रास देतायेत तबलिगी जमातचे लोक, रूम बाहेरच केली शौच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 02:30 PM2020-04-07T14:30:17+5:302020-04-07T17:37:45+5:30
एफआयआरनुसार, ही घटना 4 ऐप्रिलची आहे आहे. ज्या दोन जणांची तक्रार करण्यात आली आहे ते दोघेही तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होते. सध्या त्यांना नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली - तबलिगी जमातचे लोक क्वारंटाईन सेंटरमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे त्रास देत आहेत, याचे आणखी एक उदाहरणम समोर आले आहे. दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाईन सेंटरने एक एफआयआर दाखल केली आहे. यात तबलिगी जमातच्या दोन जणांची नावे आहेत. त्याच्यावर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेल्या रूमसमोरच शौच केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, ही घटना 4 ऐप्रिलची आहे आहे. ज्या दोन जणांची तक्रार करण्यात आली आहे ते दोघेही तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होते. सध्या त्यांना नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. हे दोघेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, यामुळे सेंटरमधील इतर लोकांनाही धोका आहे, असेही या तक्रारीत म्हणण्यात आले आहे.
तक्रारीत म्हणण्यात आले आहे, की 4 एप्रिलला सॅनिटायझेशनच्या वेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले, की रूम क्रमांक 212 बाहेर शौच करण्यात आली आहे. या रूममध्ये राहणाऱ्या मोहम्मद फहद (25) आणि जहीर (18) यांची नावेही या संबंधित एफआयआरमध्ये आहेत. हे दोघेही बाराबंकी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांवरच शौच केल्याचा आरोप आहे.
दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकजमध्ये 18 मार्चला तबलिकी जमातचा एक कार्यक्रम झाला होता. यात जवळपास 3000 लोक सहभागी झाले होते. यासाठी इंडोनेशिया, मलेशियाहूनही लोक आले होते. या मरकजमध्ये लॉकडाऊन असतानाही अनेक लोक उपस्थित असल्याचे समजले होते. यानंतर, त्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यापैकी जवळपास 2300 लोकांना काढण्यात आले. या सर्वांना वेगवेगळ्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये ठेवण्यात आले आहे.
The FIR also reads that the 2 people residing in that room have not been following the instruction of Health Dept/Govt, putting the life of people at risk and jeopardizing the entire containment measure. https://t.co/ywDcJwbzPx
— ANI (@ANI) April 7, 2020
नरेला आयसोलेशनची जबाबदारी लष्कराकडे -
नरेला आयसोलेशन कॅम्पची जबाबदारी आता भारतीय लष्करावर सोपवण्यात आली आहे. हा देशातील पहिलाच आयसोलेशन कॅम्प आहे, जेथे लष्कराच्या डॉक्टरांची मदत मागवण्यात आली आहे. या कॅम्पमध्ये रविवारपर्यंत इंडियन आर्मीचे एकूण 4 डॉक्टर, 8 नर्सिंग स्टाफ आणि सिक्युरिटी उपस्थित होते. आता भारतीय लष्कराचे डॉक्टरच हा संपूर्म कॅम्प साभाळतील, असा निर्णय सोमवारी घेण्यात आला. त्यानुसार आता येथे लष्कराच्या डॉक्टरांची संख्या वाढवायला सुरुवात झाली आहे. लष्कराच्या जवळपास 80 जणांचा चमू नरेला आयसोलेशन कम्पवर पाठविण्यात आला आहे. नरेला कॅम्पमध्ये 1200 हून अधिक संभव्य कोरोना बाधितांना ठेवण्यात आले आहे. यात दिल्लीतील निजामुद्दीमधील मरकजमध्ये आलेले लोकही आहेत.