Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:46 PM2020-06-27T12:46:53+5:302020-06-27T12:51:34+5:30
पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती.
नवी दिल्ली - पतंजली योगपीठाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे कोरोनावरील औषध जगासमोर आणलं. तसेच माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेलं औषध 100 टक्के गुणकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र आता कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता हे औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणलेली असतानाच आता बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.
बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जयपूरमध्ये कोरोनिल या औषधावरुन आता बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य तिघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कोरोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांवर नेमका कसा होतो प्लाझ्मा थेरपीचा परिणाम?; जाणून घ्याhttps://t.co/vqrxg8F2sv#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#PlasmaTherapy
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2020
पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. तर राजस्थान सरकारने यापुढचे पाऊल उचलताना गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारचे मंत्री अजित पवार यांनी ज्यांचा विश्वास असेल त्यांनी मागवावे अशी भूमिका जाहीर केली होती. याबाबत महाराष्ट्रातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
CoronaVirus News : रुग्णालयात जाण्याचं टेन्शन नाही, घरच्या घरीच घ्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला पण कसा ते जाणून घ्याhttps://t.co/nUZPXGUqO6#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2020
य़ोगगुरु रामदेव बाबांच्या या कोरोनिल औषधावरून आता राज्यांनी सक्त पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. ट्विट करून महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत काही माहिती उपलब्ध नाही. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे. यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. यामुळे महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे, असे देशमुख यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus News : जगभरात कोरोनावरील औषध आणि लसीसाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. मात्र लसीबाबत बिल गेट्स म्हणतात...https://t.co/Jci1RA6Jc2#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#BillGates
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा
घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं
CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य
"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"
CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा