पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल
By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 02:24 PM2021-01-02T14:24:27+5:302021-01-02T14:27:23+5:30
पोलिसांकडून तपास सुरू, अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मोहाली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ३१ डिसेंबर रोजी रस्ता दाखवणाऱ्या एका नकाशांवर अमरिंदर सिंग यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पोस्टर चिकटवल्याचं दिसून आलं. तसंच यावर अमरिंदर सिंग यांना जीवे मारल्यास १ दशलक्ष डॉलर्सचं बक्षीसही देण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी त्वरित तपासाला सुरूवात केली आहे. तसंच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या ५०४, ५०६ आणि १२० बी या कलमांनुसार तसंत पंजाब प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट प्रॉपर्ची ऑर्डिनन्स अॅक्ट १९९७ च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
The poster was sighted on December 31. FIR has been registered under Sections 504, 506 & 120B of IPC and Sections 3, 4, 5 of Punjab Prevention of Defacement Property Ordinance Act, 1997: Mohali City SP (2/2) https://t.co/vSXt52Q751
— ANI (@ANI) January 2, 2021
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही शोधण्यास सुरूवात केली आहे. ३१ डिसेंबर रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोहालीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी या ठिकाणी खरड-चंडिगड पुलाचं उद्धाटनही केलं होतं. त्याच वेळी पोलिसांना हे पोस्टर चिकटवण्यात आल्याचं दिसून आलं होतं. यापूर्वीही १४ डिसेंबर रोजी काही लोकांनी अमरिंदर सिंग यांच्या पोस्टरला काळं फासलं होतं.