गोव्याच्या विरोधी पक्षनेत्यांवर एफआयआर
By admin | Published: July 4, 2014 06:14 AM2014-07-04T06:14:38+5:302014-07-04T06:14:38+5:30
पर्ये येथील खाण-खंडणी प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि त्यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांच्यावर विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) गुन्हा दाखल झाला आहे
पणजी : पर्ये येथील खाण-खंडणी प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि त्यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांच्यावर विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या अटकेचीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
पर्ये येथील खाणीला परवान्यासाठी राणे पिता-पुत्रांनी दहा कोटींची लाच मागितल्याचा आरोप खाण उद्योजक व दहेज मिनरल्स खाण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक यांनी केला होता. सहा कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. स्वेच्छा दखल घेऊन खाण घोटाळ््याच्या तपासासाठी स्थापन केलेल्या एसआयटीने नाईक यांना समन्स बजावले होते. बुधवारी दुपारी तीन वाजेपासून रात्री साडेआठपर्यंत त्यांची चौकशी करून जबाब नोंद करण्यात आला. (प्रतिनिधी)