एफआयआरचा तपशील देणार नाही - सीबीआय

By Admin | Published: January 6, 2016 02:03 AM2016-01-06T02:03:36+5:302016-01-06T02:03:36+5:30

पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी माहिती देत, कथितरीत्या गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध दाखल एफआयआरचा तपशील उघड

FIR not to be given details - CBI | एफआयआरचा तपशील देणार नाही - सीबीआय

एफआयआरचा तपशील देणार नाही - सीबीआय

googlenewsNext

नवी दिल्ली : पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी माहिती देत, कथितरीत्या गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध दाखल एफआयआरचा तपशील उघड करण्यास सीबीआयने नकार दिला आहे. अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती नाकारण्याची मुभा असल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.
अपारदर्शकता कायद्यांतर्गत मागण्यात आलेल्या माहितीचा संबंध भ्रष्टाचाराच्या आरोपाशी असल्यास, सवलत प्राप्त संस्थाही माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकक्षेत येतात. या कायद्यांतर्गत आरोप कुठल्या प्राधिकरणाशी वा त्याच्या कुठल्या कर्मचाऱ्याविरुद्ध आहे अथवा नाही, याने काहीही फरक पडत नाही. याउपरही माहिती अधिकार कायद्याच्या कलम २४ चा हवाला देत, सीबीआय माहिती देण्यास नकार देत आहे. आरटीआय कायकर्ते व्यंकटेश नायक यांनी भ्रष्टाचारासंबंधित आरोपांचा समावेश असलेल्या राजन विरुद्धच्या एफआयआरचा तपशील देण्याची मागणी केली होती. मात्र, सीबीआयने माहिती अधिकार कायद्याच्या कलम २४ चा हवाला देत, याबाबत माहिती देणे टाळले.

Web Title: FIR not to be given details - CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.