उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारचा अपघात नव्हे घातपात? भाजपा आमदाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:28 PM2019-07-29T17:28:15+5:302019-07-29T17:48:03+5:30

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला झालेल्या अपघात प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

FIR registered against BJP MLA Kuldeep Singh Sengar in connection with Unnao rape case victim's accident | उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारचा अपघात नव्हे घातपात? भाजपा आमदाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारचा अपघात नव्हे घातपात? भाजपा आमदाराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

Next

लखनौ - उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला झालेल्या अपघात प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. या अपघात प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर, त्यांचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपाता असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. 



भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या उन्नाव येथील महिलेच्या कारला रविवारी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात पीडित महिला तिचा वकील गंभीर जखमी झाले होते. तर महिलेची मावशी आणि काकीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.  दरम्यान, आज या प्रकरणी बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर,  त्यांचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि अन्य आठ जणांविरोधात, हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कृत्य आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उन्नाव येथील बलात्कार प्रकरणात सीबीआयनं भाजपा आमदार कुलदीप सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे. कुलदीपनं पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात  सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह  सेंगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल देखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. 

नेमके काय आहे प्रकरण?  
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर  व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान ते मरण पावले होते.    

Web Title: FIR registered against BJP MLA Kuldeep Singh Sengar in connection with Unnao rape case victim's accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.