प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 11:53 AM2020-02-27T11:53:12+5:302020-02-27T11:56:00+5:30
Prashant Kishor : पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाठणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी झालेल्या तीव्र मतभेदांनंतर जनता दल युनायटेड पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. जेडीयूचे माजी उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्वी चंपारण्य जिल्ह्यातील एका इंजिनियने 'बिहार की बात' या त्यांच्या कॅम्पेनची प्रशांत किशोर यांनी चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाठणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे.
या प्रकरणी तक्रार दाखल करणारे इंजिनियर शाश्वत गौतम यांनी सांगितले की, 'काही काळापूर्वी मी बिहार की बात नावाचा एक प्रोजेक्ट बनवला होता. त्याच्या लाँचिंगची तयारी सुरू होती. मात्र त्यादरम्यान माझ्याकडी एक कर्मचारी ओसामा याने नोकरी सोडली आणि बिहार की बात कँपेनचा संपूर्ण कंटेंट प्रशांत किशोर यांना दिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी तो आपल्या वेबसाइटवर टाकून ब्रँडिंग सुरू केले.'
Bihar: FIR registered against political strategist Prashant Kishor in Patna under sections 420 (cheating & dishonestly inducing delivery of property) & 406 (punishment for criminal breach of trust) of the IPC for alleged plagiarism in his 'Bihar ki Baat' campaign. (file pic) pic.twitter.com/JL0jk7bmwo
— ANI (@ANI) February 27, 2020
मी माझ्याकडील संपूर्ण कंटेंट जानेवारी महिन्यात आपल्या वेबसाईटवर अपलोड केला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी फेब्रुवारी महिन्यात आपली वेबसाईट लाँच केली, असे शाश्वत गौतम यांनी सांगितले. दरम्यान, बिहार की बात या कार्यक्रमाचे संपूर्ण डिझाइन आपण प्लॅन केले होते, असा दावाही गौतम यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
बिहारमध्ये केजरीवालांच्या साथीत प्रशांत किशोर यांचा राजकीय प्रयोग ?
AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली!
प्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्टी; नितीश कुमारांवर निशाणा
आता या प्रकरणी पाटणा येथील पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर भादंवि कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गौतमने दिलेल्या पुराव्यांचा तपास करत आहेत. प्रशांत किशोर यांच्यावर आरोप करणारे शाश्वत गौतम हे पेशाने इंजिनियर असून, ते बरीच वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होते.