भयंकर! तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:02 PM2021-02-12T17:02:14+5:302021-02-12T17:03:55+5:30
सत्तुर नजिक अचानकुलम येथील फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
चेन्नई -तामिळनाडूतील (Tamilnadu) विरुधुनगरमध्ये (virudhunagar) शुक्रवारी एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीला (firecracker factory) भीषण आग लागली. या दूर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक लोक जखमी झाल्याचे समजते. सत्तुर नजिक अचानकुलम येथील फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर येथे बरेच स्फोट झाले. (Fire breaks out at firecracker factory in Tamilnadu virudhunagar)
घटनास्थळी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फटाके तयार करण्यासाठी केमिकल मिक्स करताना ही दुर्घटना घडली.
पंतप्रधान कार्यालयाकडून या दूर्घटनेत प्रभावित झालेल्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख रुपये. तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये देयण्याची घोषणा करण्यात आली आहे.
An ex-gratia of Rs. 2 lakh each has been approved from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to a fire in Virudhunagar, Tamil Nadu. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) February 12, 2021