फटाक्यांच्या फॅक्टरीला भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:53 PM2019-09-04T18:53:43+5:302019-09-04T18:55:54+5:30
घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले
पंजाब - गुरदासपूर येथील बाटला परिसरातील फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. या आगीत 18 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले असल्याने परिसरात हाहाकार मजला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळाले नसून काही वेळापूर्वी गुरुदासपूरचे उपविभागीय दंडाधिकारी दीपक भाटिया यांनी या आगीत १६ जणांचा मृत्यू आणि १० जण जखमी झाले असल्याची माहिती दिली आहे. मात्र, मृतांची आणि जखमींची संख्या वाढली असून ५० हुन अधिक कामगारांचा पत्ता लागला नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Gurdaspur Sub-Divisional Magistrate, Deepak Bhatia: 16 people have died and 10 people have been injured in the fire. https://t.co/Uiza9tMNoz
— ANI (@ANI) September 4, 2019