आंध्र प्रदेशः कोविड केअर सेंटरला आग, 10 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातलगांना 50 लाख देणार राज्य सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 11:54 AM2020-08-09T11:54:51+5:302020-08-09T11:54:57+5:30
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनीही शक्यती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
विजयवाडा -आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका हॉटेलला मोठी आग लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या हॉटेलचा वापर कोविड फॅसिलिटीच्या स्वरुपात केला जात होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशामकदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आसून आगिवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.
Andhra Pradesh: Fire breaks out at a hotel in Vijayawada, fire tenders rushed to the spot. The hotel was being used as a #COVID19 facility by a hospital. More details awaited. pic.twitter.com/2f876s2h6j
— ANI (@ANI) August 9, 2020
मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 50 लाख देणार राज्य सरकार -
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनीही शक्यती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 50-50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात येणार आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज -
यासंदर्भात कृष्णा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, की सकाळी साधारणपणे 5 वाजता ही घटना घडली. जवळपास 30 रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या आम्ही संपूर्ण इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आग विझवण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण शोधावे लागेल.
पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद -
या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त करत ट्विट केले आहे, की विजयवाडा येथील एका कोविड सेंटरला आग लागल्याने दुःखी. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. यासोबतच त्यांनी सांगितले, की यासंदर्भात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली आहे. तसेच शक्यती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख -
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही या संदर्भात दुःख व्यक्त केले आहे. तसेच अपघाताच्या कारणांची माहिती मागवली आहे. याशिवाय त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बचावाचे उपाय, तसेच नजिकच्या रुग्णालयांत जखमींना भर्ती करन्याचे निर्देश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय
Coronavirus : आठ राज्यांतील 'या' 13 जिल्ह्यांत वेगानं पसरतोय कोरोना, मृत्यू दरही धडकी भरवणारा
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण
Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!