Fire In Amritsar : अमृतसरमध्ये गुरु नानक रुग्णालयाला लागली आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 05:03 PM2022-05-14T17:03:29+5:302022-05-14T18:09:46+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एवढ्या वेगाने पसरली, की कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यावेळी रुग्णांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता.
पंजाब- अमृतसर येथील गुरु नानक रुग्णालयाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. यानंतर, रुग्णालय आणि परिसरात एकच पळापळ बघायला मिळाली. रुग्णांना रुग्णालयातून बाहेर पडणेही कठीन झाले होते. रुग्णालया मागे असलेल्या ट्रांसफॉर्मरमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एवढ्या वेगाने पसरली, की कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यावेळी रुग्णांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता. आगीची माहिती मिळताच, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.
आग लगताच रुग्णालयात पळापळ -
या रुग्णालयामागे असलेल्या ट्रासफॉर्मरने अचानक पेट घेतल्याने आगीने विक्राळ रूप धारण केले होते. आधी एका ट्रांसफॉर्मरला आग लागली, नंतर दुसऱ्याला आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण रुग्णालयातच धूर पसरला. यामुळे रुग्णांचीही धावपळ उडाली. ते आपल्या नातलगांना घेऊन रुग्णालया बाहेर पडले.
रुग्णांना श्वास घेणेही कठीण झाले होते -
या रुग्णालयाच्या वेगवेगळ्या वॉर्डमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण होते. ते रुग्णालयाबाहेर धावले आणि रस्त्यावर झोपले. रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते. मात्र, कुणीही त्यांची मदत केली नाही. ते स्वतःच बाहेर पडले आणि आपला जीव वाचवला.
मंत्री हरभजन सिंग म्हणाले, प्रकरणाची चौकशी सुरू -
घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. यानंतर, जवळपास 12 गाड्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रक्षण मिळवले. पण तोवर इमारत पूर्णपणे जळाली होती. यासंदर्भात बोलताना, कॅबिनेट मंत्री हरभजन सिंह यांनी, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.