Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 10:11 AM2021-07-26T10:11:40+5:302021-07-26T10:13:08+5:30
दिल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र सदनात आग लागल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली:दिल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र सदनात आग लागल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दिल्ली पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. (fire breaks out at maharashtra sadan at delhi )
Delhi: Fire breaks out at Maharashtra Sadan, four fire engines rushed to the spot; fire under control
— ANI (@ANI) July 26, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतल्याचे समजते.
दरम्यान, निवासी आयुक्त श्यामलाल गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ही खूप गंभीर बाब नाही. आगीच्या घटनेची आम्ही चौकशी करू. राज्यपालांसाठी राखीव असलेल्या कक्षातील AC मुळे शॉर्ट सक्रिट झाले. राज्यपाल येण्याच्या आधी त्यांच्या सुईटची तपासणी केली जाते. अन्यथा ते कुलुपबंद असते, अशी माहितीही गोयल यांनी दिली.