सूरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज

By बाळकृष्ण परब | Published: September 24, 2020 07:44 AM2020-09-24T07:44:42+5:302020-09-24T08:19:11+5:30

सूरतमधील ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत.

A fire breaks out at an Oil and Natural Gas Corporationplant in Surat | सूरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज

सूरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज

Next
ठळक मुद्देगुजरातमधील सुरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भीषण आग प्लँटमध्ये एक मोठा स्फोट झाल्याचेही सांगण्यात येत आहेही आग नेमकी कशी लागली याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही

सूरत - गुजरातमधीलसूरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भीषण आग लागली . ही आग गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास लागली असून, आगीवर नियंत्रण मिवळण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, प्लँटमध्ये एक मोठा स्फोट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही. दरम्यान आता ही आग नियंत्रणात आल्याचे ओएनजीसीने सांगितले. 

सूरतमधील ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्लँटच्या जवळच असलेल्या पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने चित्रीत केला आहे. सुरतमधील ओएनजीसीच्या हाझिरा प्लँटमध्ये पहाटे तीनच्या सुमारास लागोपाठ तीन स्फोट झाले. अशी माहिती सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिली. 



सूरतमधील ओएनजीसीच्या या प्लँटमध्ये आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी २०१५ मध्ये सूरतमधील या प्लँटमध्ये आग लागली होती. त्यावेळी सुमारे १२ जण जखमी झाले होते. 

दरम्यान, सूरतमधील हाझिरा प्लँटमधील ही आग नियंत्रणात आल्याचे ओएनजीसीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही जखमी झालेले नाही, असेही ओएनजीसीने स्पष्ट केले आहे. 

Read in English

Web Title: A fire breaks out at an Oil and Natural Gas Corporationplant in Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.