९३ दिवस गैरहजर कर्मचार्याची पाठराखण अग्निशमन अधिकार्यांचा प्रताप : उपायुक्तांनी दिली शिस्तभंगाची नोटीस
By Admin | Published: May 26, 2016 10:53 PM2016-05-26T22:53:11+5:302016-05-26T22:53:11+5:30
जळगाव : दोन वर्षांच्या कालावधित अग्नीशमन विभागातील दोन कर्मचारी परवानगी न घेता व अर्ज न देताच अनुक्रमे ९३ व ४१ दिवस गैरहजर राहिले. नंतर रजिस्टरमध्ये खाडाखोड करून हजेरी लावून घेतली. तरीही याप्रकाराबद्दल वरिष्ठांना अहवाल न पाठविणार्या अग्निशमन अधिकारी वसंत कोळी यांना उपायुक्तांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.
ज गाव : दोन वर्षांच्या कालावधित अग्नीशमन विभागातील दोन कर्मचारी परवानगी न घेता व अर्ज न देताच अनुक्रमे ९३ व ४१ दिवस गैरहजर राहिले. नंतर रजिस्टरमध्ये खाडाखोड करून हजेरी लावून घेतली. तरीही याप्रकाराबद्दल वरिष्ठांना अहवाल न पाठविणार्या अग्निशमन अधिकारी वसंत कोळी यांना उपायुक्तांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर राहून नंतर खाडाखोड करून हजेरी लावत असल्याचे प्रकार दोन वर्षांपासून सुरू असतानाही अग्नीशमन अधिकारी वसंत कोळी यांनी त्याबाबत वरिष्ठांना कोणताही अहवाल पाठविला नाही. तसेच हा प्रकार उघडकीस आल्यावर उपायुक्तांनी दोघा कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना संबंधित कर्मचार्यांची अन्य विभागात बदली करण्याची शिफारस अग्नीशमन अधिकार्यांनी केल्याने व कारवाईच्या आदेशाचा अहवाल आस्थापना विभागाकडे हेतूपूर्वक उशिरा सादर केल्याने उपायुक्तांनी कोळी यांनाच शिस्तभंगाची नोटीस देऊन तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ------ब्लेडने खाडाखोडअग्नीशमन विभागातील सुरेश नामदेव सोनवणे हे जुलै २०१४ पासून मार्च २०१६ या कालावधित एकूण ९३ दिवस तर रवींद्र साहेबराव पाटील हे जून २०१४ पासून मार्च २०१६ पर्यंत एकूण ४१ दिवस कोणतीही पूर्व परवानगी न घेता अथवा रजेचा अर्ज न देता विनापरवानगी अधूनमधून गैरहजर असतात. तसेच गैरहजर राहिल्यावरही हजेरी मस्टरवर ब्लेडने खाडाखोड करून सा करीत असल्याचे आढळून आले आहे. तर अग्नीशमन अधिकार्यांनी त्यांना सोयीस्करपणे पाठीशी घातले.