दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, 17 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:48 AM2019-02-12T07:48:44+5:302019-02-12T10:23:24+5:30
दिल्लीतील करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलला मंगळवारी (12 फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीतील करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ही भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत अनेक जणांचा मृत्यू हा गुदमरून झाला आहे. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. तर भाजलेल्या व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#UPDATE 17 dead in the fire that broke out in Hotel Arpit Palace in Karol Bagh today pic.twitter.com/gryVMFDzzj
— ANI (@ANI) February 12, 2019
अर्पित पॅलेस या हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी आग लागली तेव्हा अनेक जण गाढ झोपेत होते. या आगीतून 25 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तातडीने हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या जेणेकरुन धूर बाहेर जाईल. दिल्लीताल हे हॉटेल पाचमजली असून अनेकांनी आपला जीव वाचावा यासाठी इमारतीवरुन उडया मारल्या आहेत.
Delhi Minister Satyendra Jain on fire in Karol Bagh hotel: 17 people dead and 2 injured. Most of the people died due to suffocation. Strict action will be taken against those found guilty of negligence. District Magistrate has ordered inquiry pic.twitter.com/2JVLVvH0m8
— ANI (@ANI) February 12, 2019
Delhi Minister Satyendra Jain on fire in Karol Bagh hotel: 17 people dead and 2 injured. Most of the people died due to suffocation. Strict action will be taken against those found guilty of negligence. District Magistrate has ordered inquiry pic.twitter.com/2JVLVvH0m8
— ANI (@ANI) February 12, 2019
#UPDATE 13 dead in the fire that broke out in Hotel Arpit Palace in Karol Bagh today https://t.co/V7e48TctTu
— ANI (@ANI) February 12, 2019
Sunil Choudhary, Deputy Chief, Fire Officer on 9 dead in the fire that broke out in Hotel Arpit Palace in Karol Bagh, earlier today: Fire has been doused. Bodies are being taken out now. Rescue operation underway. #Delhipic.twitter.com/hqxsV8lyBQ
— ANI (@ANI) February 12, 2019
Spot visuals: 9 dead in the fire that broke out in Hotel Arpit Palace in Karol Bagh, earlier today. Rescue operation still underway. #Delhipic.twitter.com/F2KNcozrZK
— ANI (@ANI) February 12, 2019
#UPDATE 9 dead in the fire that broke out in Hotel Arpit Palace in Karol Bagh today. Rescue operations still underway.
— ANI (@ANI) February 12, 2019#Delhipic.twitter.com/0LGUYbM78E
#UPDATE One dead in the fire that broke out in Hotel Arpit Palace in Karol Bagh today. Rescue operations still underway. More details awaited. https://t.co/gFKT0aJcaC
— ANI (@ANI) February 12, 2019
Delhi: Earlier visuals from Hotel Arpit Palace in Karol Bagh where a fire broke out today. Firefighting and rescue operations underway. More details awaited. pic.twitter.com/l6Jd1pJpM6
— ANI (@ANI) February 12, 2019
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील किर्ती नगर परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली होती.अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर आणि सामान जळून खाक झाले होते.
Delhi: Fire breaks out in Hotel Arpit Palace in Karol Bagh. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/YH2CZO6u3D
— ANI (@ANI) February 12, 2019