मेणबत्ती खाली पडल्याने घराला आग लागली, सहा मुलांचा मृत्यू
By admin | Published: April 29, 2016 11:21 AM2016-04-29T11:21:47+5:302016-04-29T11:21:47+5:30
मेणबत्ती खाली पडून संपूर्ण घराने पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील सहा मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची दु:खद घटना शुक्रवारी सकाळी घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. २९ - मेणबत्ती खाली पडून संपूर्ण घराने पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील सहा मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची दु:खद घटना शुक्रवारी सकाळी घडली. उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातील किला चावनी गावात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये चार सख्ख्या बहिणी आणि दोन चुलत भावंडांचा समावेश आहे.
ही घटना घडली त्यावेळी फक्त ही मुलेच घरात होती. या मुलांचे आई-वडील लग्नासाठी दुस-या गावात गेले होते. रात्री झोपताना उजेडासाठी म्हणून पेटवलेली मेणबत्ती विझवायला ही मुले विसरली आणि तशीच झोपी गेली. मध्यरात्री ही मुले गाढ झोपेत असताना मेणबत्ती खाली पडली आणि संपूर्ण घराने पेट घेतला. त्यात होरपळून या मुलांचा मृत्यू झाला.
सकाळी गावातील लोकांना घरातून ज्वाळा आणि धूर येताना दिसला. गावक-यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा घराचे छत कोसळलेले होते. दुर्घटनास्थळी सहा मुले मृतावस्थेत सापडली. किला पोलिस स्थानकाच्या हद्दीत काली धाम मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. शवविच्छेदनासाठी या मुलांचे मृतदेह पाठवण्यात आले आहे.
6 children from one family die in a fire, caused by a candle toppling over, in Kila Chavni (Bareilly (UP) pic.twitter.com/cVKtEbIhSy
— ANI UP (@ANINewsUP) April 29, 2016