बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग, आठ जणांचा आगीत होरपळून दुर्देवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 01:09 PM2017-09-25T13:09:11+5:302017-09-25T13:10:23+5:30
बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. रविवारी रात्री ही आग लागली होती.
जमशेदपूर - बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत होरपळून आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहे. रविवारी रात्री ही आग लागली होती. झारखंडमधील जमशेदपूर येथे ही घटना घडली आहे. कुमारदुबी गावातील एका इमारतील हा बेकायदेशीर कारखाना चालू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात एक मोठा स्फोट झाला, त्यानंतर ही आग लागली.
'जखमींना कम्यूनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे', अशी माहिती ग्रामीण पोलीस अधिक्षक प्रभात कुमार यांनी दिली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आठ जणांचा मृत्यू झाला असून, आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 'दुर्घटनेनंतर घरमालक दुर्गपदो फरार झाला आहे', असं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही बेकायदेशीरपणे चालणा-या या कारखान्यात छोटे-मोठे स्फोट झाले होते. पण या घटना त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचू दिल्या नव्हत्या.
8 people dead, 25 injured after fire broke out at a firecracker factory in #Jharkhand's #Kumardubi; five fire tenders at the spot. pic.twitter.com/OGxMhC46om
— ANI (@ANI) September 25, 2017
'हा परिसर बंगाल सीमारेषेपासून जवळ असून याठिकाणी फटाक्यांचे अनेक कारखाने बेकायदेशीपरपणे चालवले जातात. स्थानिकांच्या आणि कारखान्यांमध्ये काम करण-या कामगारांच्या जिवाला धोका असतानाही प्रशासन मात्र सपशेल दुर्लक्ष करत होतं. या कारखान्यांमध्ये काम करणारे अनेक कामगार बंगालमधून आणले जातात', असं एका स्थानकाने सांगितलं आहे.