भयंकर! कोरबा एक्स्प्रेसच्या ४ बोगींना भीषण आग; ३ एसी बोगी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 12:23 PM2024-08-04T12:23:36+5:302024-08-04T12:24:22+5:30
कोरबा येथून विशाखापट्टणमला पोहोचलेल्या कोरबा एक्स्प्रेस ट्रेनच्या बोगीमध्ये अचानक भीषण आग लागली.
छत्तीसगडमधील कोरबा येथून विशाखापट्टणमला पोहोचलेल्या कोरबा एक्स्प्रेस (१८५१७) ट्रेनच्या बोगीमध्ये अचानक भीषण आग लागली. ही ट्रेन कोरबाहून तिरुमलाला जात होती. ट्रेन स्टेशनवर थांबली असताना स्टेशनच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर आगीची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत तीन एसी बोगी पूर्णपणे जळून खाक झाल्या. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.बी ७ बोगीच्या टॉयलेटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हा अपघात झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांना सुरुवातीला समजलं.
#विशाखापट्टनम में ट्रेन के कोच में लगी आग कोरबा एक्सप्रेस के B-7 कोच में लगी आग रेलवे स्टेशन पर खड़ी ट्रेन में लगी भीषण आग कोरबा से तिरुमाला जा रही थी कोरबा एक्सप्रेस आग पर काबू पाने में जुटीं दमकल की गाड़ियां #train_accident@AshwiniVaishnawpic.twitter.com/KXtmSGefxT
— DINESH SHARMA (@medineshsharma) August 4, 2024
बी ७ बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे, तर बी ६ आणि एम१ बोगीलाही आग लागली आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी ट्रेनमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विशाखापत्तनम में कोरबा एक्सप्रेस के 4 डिब्बे में आग लगी।pic.twitter.com/WxxQZ0eDpS
— Akshit Singh (@iAkshitSingh) August 4, 2024