दिल्लीत सरकारी इमारतीला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:45 AM2019-03-07T05:45:01+5:302019-03-07T05:45:07+5:30
दक्षिण दिल्लीतील सीजीओ संकुलात असलेल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयात बुधवारी लागलेल्या आगीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) उप-निरीक्षकाचा मृत्यू झाला
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सीजीओ संकुलात असलेल्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यालयात बुधवारी लागलेल्या आगीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) उप-निरीक्षकाचा मृत्यू झाला व अनेक महत्त्वाच्या फायली व दस्तावेज नष्ट झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
११ मजल्यांच्या पंडित दीनदयाळ अंत्योदय भवनच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली. सीआयएसएफचे उप-निरीक्षक एम. पी. गोदारा हे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असताना विषारी वायुमुळे ते बेशुद्ध पडले. तेथून त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. संपूर्ण बी-१ विंगचा ८० टक्के भाग आगीत जळाला असून अनेक फायली व दस्तावेज नष्ट झाले आहेत.