महेंद्रसिंग धोनी राहत असलेल्या हॉटेलमध्ये आग
By admin | Published: March 17, 2017 09:14 AM2017-03-17T09:14:10+5:302017-03-17T10:36:50+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी राहत असलेल्या हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी राहत असलेल्या हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या आगीमधून महेंद्रसिंग धोनी सुखरुप बाहेर पडला आहे. शुक्रवारी सकाळची ही घटना आहे. आग नेमकी कशी लागली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
विजय हजारे ट्रॉफीमधील सामन्यासाठी महेंद्रसिंग धोनी संघासोबत दिल्लीमध्ये आला होता. दिल्लीमधील पालम परिसरातील हॉटेलमध्ये महेंद्रसिंग धोनी राहत होता. त्याच्यासोबत संघातील खेळाडूंचही याच हॉटेलमध्ये वास्तव्य होतं. सर्वजण सुखरुप असून आगीत खेळाडूंचं क्रिकेट किट जळालं आहे. क्रिकेट किट जळालं असल्याने आज होणारा सामना रद्द करण्यात आला असून उद्या खेळवला जाणार आहे.
Delhi: Fire had broken out in store in Dwarka's Welcome hotel complex. MS Dhoni and Jharkhand team who were staying there evacuated safely pic.twitter.com/AMnRcIEZmt
— ANI (@ANI_news) March 17, 2017
आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नसल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे सकाळी 6.30 वाजता त्यांना वेलकम हॉटेलमध्ये आग लागल्याचा फोन आला होता. द्वारकामधील सेक्टर 10 मध्ये हे हॉटेल आहे. अग्निशमन दलाने तात्काळ 30 गाड्या पाठवल्या. सात वाजून 50 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशन दलाला यश मिळालं.
महेंद्रसिंग धोनी विजय हजारे ट्रॉफीमधील सेमी फायनल सामना खेळण्यासाठी दिल्लीत आहे. विदर्भला सहा विकेट्सनी पराभव केल्यानंतर धोनीच्या नेतृत्तात खेळणारा झारखंड संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.