आदर्श नगरात घराला आग, एक लाखाचे नुकसान
By admin | Published: April 14, 2016 12:54 AM2016-04-14T00:54:30+5:302016-04-14T00:54:30+5:30
जळगाव: आदर्श नगरात वास्तव्याला असणारे भानुदास लक्ष्मण वाणी यांच्या घरात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात ए.सी., वॉशिंग मशिन, इन्व्हर्टर,शौचालय व बाथरुमचे दरवाजे आदी साहित्य जळून खाक झाले. शेजारील नागरिक व अग्निशमन दलाच्या एका बंबाद्वारे आग विझविण्यात आली. यात एक लाखाच्यावर नुकसान झाले आहे.
Next
ज गाव: आदर्श नगरात वास्तव्याला असणारे भानुदास लक्ष्मण वाणी यांच्या घरात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात ए.सी., वॉशिंग मशिन, इन्व्हर्टर,शौचालय व बाथरुमचे दरवाजे आदी साहित्य जळून खाक झाले. शेजारील नागरिक व अग्निशमन दलाच्या एका बंबाद्वारे आग विझविण्यात आली. यात एक लाखाच्यावर नुकसान झाले आहे.सेवानिवृत्त नगररचनाकार असलेले वाणी हे इस्त्रीसाठी टाकलेले कपडे घेण्यासाठी लॉण्ड्रीवर गेले होते, तर पत्नी हेमलता वाणी या एसएमआयटी कॉलजेला शिक्षिका आहेत, त्यामुळे त्याही घरी नव्हत्या. त्याच काळात घरात शॉर्ट सर्किट झाल्याने वायरींग जळून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या. बंद घरातून धूर निघत असल्याने शेजारच्यांनी तत्काळ वाणी यांना घटनेची माहिती दिली व बोअरवेल सुरू करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तीन खोल्यांमध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाचा एक बंब लागला.शिरसोली रस्त्यावर कचर्याला आगशिरसोली रस्त्यावर जैन कंपनीसमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचर्यालाही बुधवारी सकाळी आग लागली. यात नुकसान काहीच झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.