उत्तर प्रदेशमध्ये लेदर फॅक्टरीला आग, १३ मृत्यूमुखी

By admin | Published: November 11, 2016 11:08 AM2016-11-11T11:08:55+5:302016-11-11T11:04:44+5:30

उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये एका लेदर फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Fire in leather factory in Uttar Pradesh, 13 deaths | उत्तर प्रदेशमध्ये लेदर फॅक्टरीला आग, १३ मृत्यूमुखी

उत्तर प्रदेशमध्ये लेदर फॅक्टरीला आग, १३ मृत्यूमुखी

Next

ऑनलाइन लोकमत

गाझियाबाद, दि. ११ - उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये एका लेदर फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.  त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
साहिदाबाद भागातील शहीद नगर येथे जॅकेट बनवणारी एक लेदर कंपनीत आज पहाटे चारच्या सुमारास ही भीषण आग लागली. कंपनीतील कामगारांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली , मात्र १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. 
वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या ९ ते १० गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

Web Title: Fire in leather factory in Uttar Pradesh, 13 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.