पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा- ओमन चंडी
By admin | Published: April 10, 2016 10:27 AM2016-04-10T10:27:28+5:302016-04-10T11:31:41+5:30
पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा- ओमन चंडी
ऑनलाइन लोकमत
थिरुअनंतपुरम, दि. 10- केरळमधल्या परावूर इथल्या पुत्तिंगल मंदिरात भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेप्रकरणी केरळचे मुख्यमंत्र्यांनी पुत्तिंगल मंदिरात लागलेली आग म्हणजे अभूतपूर्व आणि धोक्याची सूचना देणारी असल्याचं म्हटलं आहे.फटाक्यांमुळे झालेल्या या स्फोटात जवळपास 92 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी या दुर्घटनेमुळे मतदानाच्या ठिकाणी जाण्याच्या कार्यक्रम रद्द केला आहे. आता ते थेट आगीच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. जखमींना योग्य उचपार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही यावेळी ओमन चंडी यांनी सांगितलं. मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जखमींना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून योग्य उपचार देण्यावर आमचा भर राहील, असंही यावेळी ओमन चंडी यांनी सांगितलं आहे.
ही गंभीर आणि धोक्याची घंटा देणारी घटना आहे. जखमींच्या नातेवाईकांच्या मतानुसार चांगल्या हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात येतील, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिली आहे. दुपारी 3 वाजता ओमन चंडींनी कॅबिनेटची बैठकही बोलावली आहे.