बंगळुरूतील बेलांदूर सरोवराला लागली आग, विषारी फेसाने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:37 AM2018-01-21T00:37:28+5:302018-01-21T00:38:07+5:30
बंगळुरुतील बेलांदूर सरोवरावरील विषारी फेसाने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्यासाठी लष्कराचे ५००० जवान प्रयत्नांची शर्थ करत होते. सात तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
बंगळुरु :बंगळुरुतील बेलांदूर सरोवरावरील विषारी फेसाने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्यासाठी लष्कराचे ५००० जवान प्रयत्नांची शर्थ करत होते. सात तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
ही आग एवढी भयंकर होती की, आकाशात अक्षरश: धुराळे लोळ उठत होते. सैन्याच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी, नागरी वसाहतीत ती पसरू नये, याची काळजी हे जवान घेत आहेत. या आगीमुळे सरोवर परिसरातील अनेक साप बाहेर आल्याने आग विझविण्यात अडथळे आले. एका जवानाला सापाने चावाही घेतला.
राष्ट्रीय हरित लवादाने कर्नाटक सरकारला यापूर्वीच सूचना दिली आहे की, या सरोवर परिसराची स्वच्छता करावी. मात्र, सरकारने अद्याप याची दखल घेतलेली नाही. सरोवरात सोडले जाणारे प्रदूषित पाणी व अन्य विषारी द्रव्य थांबविण्यात यावेतण असे लवादाने म्हटले होते.
बंगळुरुत रोज १२८० मिलियन लिटर सांडपाणी निर्माण होते. फक्त ७२१ मिलियन लिटर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता शहराकडे असून, ५०० पैकी १३७ केवळ ६०० मिलियन लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. तर, उर्वरित सांडपाणी या व अन्य सरोवरांमध्ये जाते. (वृत्तसंस्था)