मध्य प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 20 ठार

By admin | Published: June 7, 2017 06:57 PM2017-06-07T18:57:44+5:302017-06-07T20:01:48+5:30

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन 20 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

Fireworks factory blast in Madhya Pradesh, 20 killed | मध्य प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 20 ठार

मध्य प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 20 ठार

Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 06 -  मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन 20 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. 
बालाघाटमधील भाटन गावामध्ये असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात आज दुपारी अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले आहेत.
बालाघाटमधील जिल्हाधिकारी भरत यादव यांनी सांगितले की, फटाक्याच्या कारखान्यातून मृत्यदेह बाहेर काढण्याचे काम काम सुरु असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप कारखान्यात दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यलयापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा फटाका कारखाना असून ही दुर्घटना घडली, त्यावेळी फटाका कारखान्यात कामगार काम करत होते, असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आग कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे. 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल, तर जखमींचा सर्व खर्च सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली.

Web Title: Fireworks factory blast in Madhya Pradesh, 20 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.